उल्हासनगर महापालिकेत ४० टक्के कंत्राटी कामगारांत राजकीय नेते, पालिका अधिकारी व नगरसेवकांच्या नातेवाईकाचा भरणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 17:43 IST2026-04-26T17:42:41+5:302026-04-26T17:43:28+5:30
महापालिकेच्या २८ एप्रिल रोजीच्या स्थायी समिती सभेत सुरक्षारक्षक, वार्डन, माळी व मंजूर आदी पदाची कंत्राटी पद्धतीने भरतीचा प्रस्ताव आहे.

उल्हासनगर महापालिकेत ४० टक्के कंत्राटी कामगारांत राजकीय नेते, पालिका अधिकारी व नगरसेवकांच्या नातेवाईकाचा भरणा
उल्हासनगर : महापालिकेच्या २८ एप्रिल रोजीच्या स्थायी समिती सभेत सुरक्षारक्षक, वार्डन, माळी व मंजूर आदी पदाची कंत्राटी पद्धतीने भरतीचा प्रस्ताव आहे. महापालिकेच्या ऐकून कामगार संख्ये पैकी ४० टक्के पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आले असून भरती करण्यात आलेल्या कामगारा मध्ये नगरसेवक, पालिका अधिकारी, राजकीय नेते यांच्या नेतेवाईकांचा भरणा असल्याची टिका होत आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या नवीन मंजूर आकृतीबंधानुसार, एकूण ३०४० पदे निश्चित करण्यात आली. आकृतीबंद पदे मंजुरीसाठी शासनाकडे पाठविले असून त्याला मंजुरी मिळताच रिक्त १२८२ पदे भरण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी गेल्या वर्षी दिले होते. तर महापालिका कारभार चालविण्यासाठी खाजगी ठेकेदाराद्वारे ११०० पेक्षा जास्त विविध पदासाठी कंत्राटी कामगारांची भरली केली असून त्याची टक्केवारी ४० वर गेली. याउलट, महापालिकेच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या आता केवळ १९४० इतकी राहिली आहे. म्हणजेच, महापालिकेचा कारभार आता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती गेला. नियुक्त केलेले बहुतांश कंत्राटी कामगार स्थानिक नेते, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याने, महापालिका कारभारात गोंधळ निर्माण झाला आहे.
महापालिका स्थायी समितीची सभा मंगळवारी २८ एप्रिल रोजी होत असून सभेत सुरक्षारक्षक, वार्डन, माळी, मंजूर आदी कंत्राटी कामगार भरती करण्याचा प्रस्ताव आहे. एकीकडे कंत्राटी कामगारांची संख्या ४० टक्क्यावर गेली असून महापालिका अधिकारी, नगरसेवक आणि स्थानिक राजकीय नेत्यांचे 'जवळचे' नातेवाईक असतील, तर महापालिकेच्या गुप्त आणि संवेदनशील माहितीची सुरक्षितता धोक्यात आली.
महापालिकेच्या कार्यक्षमतेवर आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे योग्य उमेदवारांना संधी मिळत नाही, तसेच प्रशासकीय कामकाजात वशिलेबाजीला प्रोत्साहन मिळते. महापालिका आयुक्तानी या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन या नेमणुकांची कसून चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. उद्यान विभागासह अन्य विभागाच्या प्रमुख पदी कंत्राटी अधिकारी असल्याने, कोट्यावधीच्या विकास कामावर हे कंत्राटी विभाग प्रमुख निर्णय व सही करणार का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
आकृतीबंद पदे शासनाकडे मंजुरीसाठी.... उपायुक्त दिपाली चौगुले
महापालिका कारभारासाठी विविध खाजगी ठेकेदारा मार्फत एकूण ११०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार नियुक्त केले. महापालिकेच्या रिक्त पदाची भरती करण्यासाठी नवीन आकृतीबंद पदे मंजुरीसाठी शासनाकडे पाठविले आहे.