ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी २९१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ५ लाख ४३ हजार ८१४ रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ११ हजार ९ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ४५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता १ लाख ३५ हजार ५५७ झाली आहे. शहरात एका मृत्यूची नोंद आहे. कल्याण - डोंबिवलीत ७१ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यूंची नोंद आहे. नवी मुंबईत ७९ रुग्णांची वाढ झाली असून ३ मृत्यूंची नोंद आहे. उल्हासनगरमध्ये १२ रुग्ण सापडले असून ३ मृत्यूंची नोंद आहे. भिवंडीत नवीन रुग्ण मिळाला नसून, एका मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये ३३ रुग्ण आढळले. अंबरनाथमध्ये १८ रुग्ण आढळले असून एका मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये १७ रुग्णांची नोंद तर ठाणे ग्रामीणमध्ये २७ नव्या रुग्णांची नोंद आहे.