शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश पुजारीसह १३ जणांना लावला मोक्का

By admin | Updated: January 25, 2016 01:19 IST

केबल व्यावसायिक सच्चानंद कारिरा हत्येप्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. कुविख्यात खंडणीखोर सुरेश पुजारी याच्यासह १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली

उल्हासनगर : केबल व्यावसायिक सच्चानंद कारिरा हत्येप्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. कुविख्यात खंडणीखोर सुरेश पुजारी याच्यासह १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली असून पुजारी याच्यावर रेडकॉर्नर नोटीस जारी करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नागरिकांनी फोनवर आलेल्या धमकीला न घाबरता बिनधास्त तक्रार दाखल करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. उल्हासनगरातील नामांकित केबलचालक सच्चानंद कारिरा यांची ११ सप्टेंबर २०१५ रोजी ४ वाजण्याच्या दरम्यान कार्यालयात बसले असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळी घालून हत्या केली. उल्हासनगर पोलीस ठाण्यात सुरेश पुजारी याच्यासह संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केल्यावर काही दिवसांतच सीसीटीव्हीत कैद झालेला शार्पशूटर नितीन अवघडे याला सांगली येथून अटक केली. पोलिसांनी पुजारीच्या एकूण १२ जणांना अटक केली आहे. १२ पैकी ६ दलाल व ६ जण शार्पशूटर असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तूल व २० जिवंत राउंड जप्त केल्याची माहिती जाधव यांनी दिली.सुरेश पुजारी याने अनेक व्यापाऱ्यांना फोन करून खंडणी मागून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. याप्रकाराने व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून राष्ट्रवादीचे युवा नेता ओमी कलानी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्तांची भेट घेतली होती. व्यापाऱ्यांनी न घाबरता थेट तक्रार करण्याचे आवाहन त्यावेळी जाधव यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेत उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्यासह त्यांचे तपासी सहकारी अधिकारी व परिमंडळातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.