शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रेतीमाफियांवर धडक कारवाईत १० कोटींचे साहित्य जप्त

By admin | Updated: October 1, 2015 01:38 IST

जिल्ह्यातील अवैध रेतीउपशाविरोधात एकाच वेळी ठाणे जिल्हा प्रशासनाकडून ठाणे, कल्याण व भिवंडीतील रेतीबंदरांवर कारवाई करण्यात आली

ठाणे : जिल्ह्यातील अवैध रेतीउपशाविरोधात एकाच वेळी ठाणे जिल्हा प्रशासनाकडून ठाणे, कल्याण व भिवंडीतील रेतीबंदरांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी रात्री सुरू होऊन बुधवारी सकाळपर्यंत सुरू होती. या कारवाईत अंदाजे ३ हजार २२१ ब्रास रेतीसह ४२ क्रेन, ८२ लाकडी बोटी, तीन ट्रक त्याचबरोबर १ ड्रेझर, २ सक्शन पंप आणि पाच बार्ज जप्त करण्यात आले आहेत. यांची किंमत अंदाजे १० कोटींच्या घरात असून अशा प्रकारे आतापर्यंतची सर्वाधिक मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.अवैध प्रकारे होणाऱ्या रेतीउपशाप्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसेंदिवस तक्रारींचा ओघ वाढत आहे. त्यानुसार, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, संबंधित तहसीलदार व इतर महसूल कर्मचारी अशा १०० ते १५० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या वेळी जिल्ह्यातील सर्व रेतीबंदरांच्या खाडीपात्रांमध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गस्ती नौकांनी पाहणी करून कारवाई केली. त्यानुसार, ठाण्यातील मुंब्रा-पारसिक रेतीबंदर येथून ५३ ब्रास रेती, गायमुख येथून ९ क्रेन व १५ लाकडी बोटी आणि १२५ ब्रास रेती, गांधी रेतीबंदरातून १ क्रेन,३२ लाकडी बोटी आणि १५० ब्रास रेती आणि नागला रेतीबंदरमधून ३५ लाकडी बोटी व १०५ ब्रास रेतीसाठा जप्त केला. तसेच कल्याण तालुक्यातील कल्याण रेतीबंदरातून ३ ट्रक व ३९१ ब्रास रेतीसाठा आणि २० क्रेन, मोठागाव ठाकुर्लीमधून ५० ब्रास रेती आणि १२ क्रेन जप्त केल्या आहेत. याप्रकरणी बाजारपेठ आणि विष्णूनगर या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत. भिवंडी तालुक्यातील मौजे वेहले रेतीबंदरावरून २ सक्शन पंप खाडीत बुडविण्यात आले. अंजूरफाटा ते चिंचोटी पूल येथून ५८९ ब्रास रेती, काल्हेर येथून १९७ ब्रास रेती आणि कशेळीतून ८५ ब्रास रेतीसाठा जप्त केला आहे. त्याचबरोबर जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी भिवंडी मौजे दिवे-अंजूर येथील खारेगाव ब्रीजखाली असलेल्या खाडीकिनाऱ्यालगत कारवाई करून १ ड्रेझर, २ सक्शन पंप व ५ बार्ज जप्त केले आहेत. याप्रकरणीही अज्ञातांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या ३ हजार २२१ ब्रास रेतीसाठ्याचा लिलाव करण्यात येणार आहे. त्याची किंमत १ कोटी १३ लाख ४२ हजार ५०० रुपये असावी, असा अंदाज वर्तविला आहे. (प्रतिनिधी)