शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

आजपासून भारताची मोहीम सुरू, डेव्हिस कप विश्वगट पात्रता, बलाढ्य कॅनडाविरुद्ध करणार दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 1:52 AM

डेव्हिस कप टेनिस स्पर्धेच्या विश्व गटात प्रवेश करण्यासाठी शुक्रवारपासून भारतीय संघ बलाढ्य कॅनडाच्या आव्हानाला सामोरे जाईल. विश्व गटात प्रवेश करण्यासाठी सलग चौथ्यांदा प्रयत्न करणा-या भारताची मदार युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन यांच्यावर असेल.

एडमंटन : डेव्हिस कप टेनिस स्पर्धेच्या विश्व गटात प्रवेश करण्यासाठी शुक्रवारपासून भारतीय संघ बलाढ्य कॅनडाच्या आव्हानाला सामोरे जाईल. विश्व गटात प्रवेश करण्यासाठी सलग चौथ्यांदा प्रयत्न करणा-या भारताची मदार युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन यांच्यावर असेल.कॅनडाच्या कसलेल्या डेनिस शापोवालावविरुद्ध या दोघांनाही आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. डापोवालावने माँट्रीयल मास्टर्स स्पर्धेत दिग्गज खेळाडू राफेल नदालला धक्का देत टेनिस विश्वाचे लक्ष वेधले होते. यानंतर, त्याने यूएस ओपनची चौथी फेरी गाठणारा सर्वांत लहान खेळाडू म्हणून विक्रम नोंदवला होता. १८ वर्षीय आणि जागतिक क्रमवारीत ५१व्या स्थानी असलेल्या शापोवालोवने गेल्या काही महिन्यांमध्ये शानदार खेळ करताना जुआन मार्टिन डेल पेत्रो आणि जो विल्फ्रेड त्सोंगा यांनाही पराभूत करण्याची कामगिरी केली.या अत्यंत महत्त्वपूर्ण लढतीत भारताची मदार युकी आणि रामकुमार यांच्यावर असेल. या दोघांनी काही दिवसांपूर्वीच गेल मोंफिल्स आणि डॉमनिक थिएम या नावाजलेल्या खेळाडूंना पराभूत करत टेनिस विश्वात खळबळ माजवली होती. युकी सध्या १५७व्या स्थानी असून रामकुमार १५४व्या स्थानी आहे. या दोघांनाही अनुभवाच्या कमतरतेमुळे अनेकदा महत्त्वाच्या लढतींमध्ये पराभवास सामोरे जावे लागले आहे. मात्र, या दोघांचाही गेल्या काही महिन्यातील खेळ पाहता, नक्कीच शापोवालोवला पराभूत करण्यात हे दोघे यशस्वी ठरतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.खेळाडू म्हणून युकी परिपक्व झाला असून त्याने डेव्हिस कपच्या तणावपूर्ण सामन्यांमध्ये कणखर मानसिकता दाखवली आहे. गेल्या काही सामन्यांत त्याने जे विजय मिळवले आहेत, त्यातून तो प्रतिकूल परिस्थितीला चांगल्या प्रकारे हातळण्याची क्षमता राखून असल्याचे सिद्ध झाले. दुसरीकडे, रामकुमारने आपल्या वेगवान आणि मोठ्या सर्व्हिस तसेच चांगल्या तंदुरुस्तीच्या जोरावर भारताच्या आशा पल्लवित केल्या आहेत. (वृत्तसंस्था)कॅनडाचा अन्य एक खेळाडू वासेक पोसपिसिल जागतिक क्रमवारीत ८२व्या स्थानी आहे. मात्र त्याचे फारसे दडपण युकी व रामकुमार यांच्यावर नसेल. वासेकने याआधीच्या आपल्या पाचही सामन्यात सलग पराभव पत्करला असून नुकताच झालेल्या यूएस ओपनमध्येही तो पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता. युकीने २०१४ साली चेन्नई ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोसपिसिलचा सामना केला होता. त्या लढतीत युकी पराभूत झाला होता. तसेच, रामकुमार आतापर्यंत एकदाही पोसपिसिलविरुद्ध खेळलेला नाही.युकी आणि रामकुमार यांनी पहिल्या दिवशी गुण मिळवण्यात यश मिळवले, तर हा सामना जिंकण्यासाठी भारत मजबूत स्थितीमध्ये येईल. त्याचवेळी, कॅनडाचा जागतिक क्रमवारीतील ११वा खेळाडू मिलोस राओनिच याच्या अनुपस्थितीमध्ये भारताकडे हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी असेल, असे मत टेनिसतज्ज्ञांनी मांडले आहे.सलग चौथ्या वर्षी भारतीय संघ विश्व गटात पात्रता मिळवण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. याआधी तीन वर्ष भारताला प्ले आॅफमध्ये सर्बिया (बंगळुरू २०१४), झेक प्रजासत्ताक (नवी दिल्ली २०१५) आणि स्पेन (नवी दिल्ली २०१६) यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत