शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Australian Open 2026 : जोकोविचच स्वप्न अधुरेच! फायनल जिंकत 'करिअर ग्रँड स्लॅम'सह अल्काराझनं रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 17:32 IST

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये जोकोविचला पराभूत करणारा तो पहिला टेनिस स्टार ठरला.

Australian Open Final 2026 Carlos Alcaraz Beats Novak Djokovic To Win 1st Aus Open Title : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियन दिग्गज टेनिस स्टार नोव्हाक जोकोविच आणि स्पेनचा उदयोन्मुख स्टार कार्लोस अल्काराझ यांच्यात जेतेपदासाठी ऐतिहासिक लढत रंगल्याचे पाहायला मिळाले. या लढतीत दहा वेळचा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील विजेत्या जोकोविचला पराभूत करत कार्लोस अल्काराझनं पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकत नवा इतिहास रचला आहे. दुसरीकडे जोकोविचचे विक्रमी २५ वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मेलबर्नच्या कोर्टवर अनुभवी जोकोविचनं पहिल्या सेट ६-२ असा जिंकत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील फायनलमध्ये अपराजित राहण्याचा आपला विक्रम कायम ठेवण्याचे संकेत दिले होते. पण त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये तो कमी पडला. युवा अल्काराझनं दमदार कमबॅक करत दुसरा सेट ६-२ आणि तिसरा सेट ६-३ असा आपल्या नावे करत 'करिअर ग्रँडस्लॅम'च्या दिशेनं पाऊल टाकले. चौथ्या सेटमध्ये जोकोनं तगडी फाइट दिली. पण काही चुका त्याला या सेटमधील विजयासह विक्रमी ग्रँड स्लॅमपासूनही दूर घेऊन गेल्या. चौथा सेट ७-५ असा जिंकत अल्काराझनं करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण करत नवा इतिहास रचला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये जोकोविचला पराभूत करणारा तो पहिला टेनिस स्टार ठरला. एवढेच नाही तर सर्वात कमी वयात चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.   

Elena Rybakina Maiden AUS Open Title : नंबर वन सबालेंकाला पराभवाचा धक्का; एलिना रयबाकिना बनली नवी सम्राज्ञी

अल्काराझनं रचला इतिहास, असा पराक्रम करणारा ठरला सर्वात युवा टेनिसपटू

कार्लोस अल्काराझ २२ वर्षे २७२ दिवस वयात किमान एकदा चारही ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम अमेरिकन टेनिस दिग्गज डॉन बड्ज यांच्या नावावर होता. त्यांनी १९३८ च्या फ्रेंच चॅम्पियनशिपमध्ये वयाच्या २२ वर्षे ३६३ दिवसांचा असताना करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले होते.

आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सातवे जेतेपद

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील जेतेपदासह अल्कराझनं आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत सात ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. विम्बल्डनची दोन विजेतेपदे (२०२३, २०२४), फ्रेंच ओपनची दोन विजेतेपदे (२०२४, २०२५) आणि यूएस ओपन स्पर्धेत त्याने (२०२२, २०२५) दोन वेळा आपली छाप सोडली होती.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Alcaraz defeats Djokovic, wins Australian Open 2026, achieves Career Grand Slam.

Web Summary : Carlos Alcaraz defeated Novak Djokovic in the Australian Open 2026 final, securing his first Aus Open title and completing a Career Grand Slam. Alcaraz is the first to defeat Djokovic in an Australian Open final and the youngest to win all four Grand Slams.
टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिस