शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

काय सांगता? WhatsApp वर 'हे' जबरदस्त फीचर वापरून कोणालाही सहज करता येईल ट्रॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 2:04 PM

WhatsApp News : व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. मात्र असे काही फीचर्स आहेत. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. आज आपण अशाच एका फीचर्सबाबत जाणून घेऊया.

नवी दिल्ली - WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. अनेक जण दिवसातील बराचसा वेळ हा व्हॉट्सअ‍ॅपवरच असतात. व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. मात्र असे काही फीचर्स आहेत. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. आज आपण अशाच एका फीचर्सबाबत जाणून घेऊया. या फीचरच्या मदतीने युजर्स एखाद्या व्यक्तीला ट्रॅक करू शकतात. तसेच फीचरच्या मदतीने तुम्ही नवीन पत्ता सहज शोधू शकता. आपल्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना देखील स्वतःचे लोकेशन पाठवू शकतात. या फीचरचा उपयोग सुरक्षेसाठी देखील करता येईल.

असं शेअर करा तुमचं लोकेशन

- सर्वप्रथम तुमचे व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.

- आता चॅट पर्यायावर जा.

- तुम्हाला ज्या व्यक्तीला आपले लोकेशन पाठवयाचे आहे, त्याचे नाव सिलेक्ट करा.

- व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये खाली + किंवा क्लिप आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा.

- तुम्हाला लोकेशन निवडण्याचा पर्याय दिसेल.

- तुम्हाला Send Your Current Location आणि Share Live Location असे दोन पर्याय दिसतील.

- तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील पर्याय निवडून सेंड करू शकता.

लोकेशन शेअर करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

जर तुम्ही एखाद्याला तुमचे Current location पाठवले तर हे तुम्ही ज्या ठिकाणी आहात, तेथील लोकेशन असेल. जर तुम्ही Live location पाठवल्यास तुमच्या हालचालींसोबत, तुम्ही जसा प्रवास करेल तसे हे लोकेशन बदलत राहील. लाइव्ह लोकेशनवर क्लिक केल्यानंतर हे लोकेशन तुम्हाला 15 मिनिटे, 1 तास की 8 तासांसाठी पाठवायचे आहे, याचा पर्याय देखील मिळेल. तसेच यावरून तुम्ही एखाद्या व्यक्तीला लोकेशनच्या मदतीने ट्रॅक देखील करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील पर्याय निवडू शकता. जर तुम्हाला लाइव्ह लोकेशन शेअरिंग बंद करायचे असेल तर लाईव्ह लोकेशन शेअरवर जाऊन स्टॉप बटण दाबावे लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अलर्ट! 15 मे नंतर WhatsApp वर युजर्सना करता येणार नाही ऑडियो-व्हिडीओ कॉलिंग; जाणून घ्या नेमकं कारण

15 मे नंतरही युजर्सने बर्‍याच नोटिफिकेशन्सनंतरही आपण व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन प्रायव्हसी धोरण स्वीकारले नाही तर युजर्सना त्रास होऊ शकतो. नवी पॉलिसी स्वीकारण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने अतिरिक्त वेळ दिला आहे. मात्र युजर्स हे टाळू शकत नाहीत. नवी पॉलिसी न स्वीकारल्यास युजर्स व्हॉट्सअ‍ॅपचे काही फीचर्स वापरू शकणार नाहीत. WhatsApp च्या सलग अनेक रिमांडनंतर युजर्सनी प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारल्यास त्यांचे खाते बंद केले जाणार नाही. परंतु युजर्स त्यांची चॅट यादी पाहू शकणार नाहीत. WhatsApp वर येणारे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल घेता य़ेतील. येत्या काही आठवड्यात WhatsApp ने नवी पॉलिसी स्वीकारली नाही तर व्हॉट्सअ‍ॅपवर येणारी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल सूचना येणे बंद होईल. WhatsApp वर मेसेज पाठविता येणार नाही. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप वापरणारेही कॉल करू शकणार नाहीत. तर आपण नवीन पॉलिसी स्वीकारत नसाल तर व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद केले जाणार नाही. पण व्हॉट्सअ‍ॅपच्या कुठल्याही फीचरचा आनंद आपण घेऊ शकणार नाही.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान