अलर्ट! 15 मे नंतर WhatsApp वर युजर्सना करता येणार नाही ऑडियो-व्हिडीओ कॉलिंग; जाणून घ्या नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 09:37 AM2021-05-12T09:37:43+5:302021-05-12T09:47:51+5:30

Whatsapp Audio Video Calling : आपल्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने 15 मे ही अंतिम मुदत ठरवून दिली होती; मात्र चहूबाजूंनी टीका होऊ लागल्यावर आता व्हॉट्सअ‍ॅपने या मुदतीपासून माघार घेतली आहे.

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp गेल्या काही दिवसांपासून नव्या पॉलिसीमुळे जोरदार चर्चेत आले आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. आता युजर्ससाठी एक खूशखबर आहे.

आपल्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने 15 मे ही अंतिम मुदत ठरवून दिली होती; मात्र चहूबाजूंनी टीका होऊ लागल्यावर आता व्हॉट्सअ‍ॅपने या मुदतीपासून माघार घेतली आहे. युजर्सने नव्या पॉलिसीचा स्वीकार नाही केला तरी त्यांचे अकाऊंट सुरूच राहणार आहे..

15 मे नंतरही युजर्सने बर्‍याच नोटिफिकेशन्सनंतरही आपण व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन प्रायव्हसी धोरण स्वीकारले नाही तर युजर्सना त्रास होऊ शकतो. नवी पॉलिसी स्वीकारण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने अतिरिक्त वेळ दिला आहे. मात्र युजर्स हे टाळू शकत नाहीत.

नवी पॉलिसी न स्वीकारल्यास युजर्स व्हॉट्सअ‍ॅपचे काही फीचर्स वापरू शकणार नाहीत. WhatsApp च्या सलग अनेक रिमांडनंतर युजर्सनी प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारल्यास त्यांचे खाते बंद केले जाणार नाही. परंतु युजर्स त्यांची चॅट यादी पाहू शकणार नाहीत.

WhatsApp वर येणारे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल घेता य़ेतील. येत्या काही आठवड्यांत WhatsApp ने नवी पॉलिसी स्वीकारली नाही तर व्हॉट्सअ‍ॅपवर येणारी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल सूचना येणे बंद होईल.

WhatsApp वर मेसेज पाठविता येणार नाही. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप वापरणारेही कॉल करू शकणार नाहीत. तर आपण नवीन पॉलिसी स्वीकारत नसाल तर व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद केले जाणार नाही. पण व्हॉट्सअ‍ॅपच्या कुठल्याही फीचरचा आनंद आपण घेऊ शकणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार न केल्यास कालांतराने यूझरचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट आपोआप निष्क्रिय होणार आहे. प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी 8 फेब्रुवारी ही अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र त्यानंतर ही मुदत 15 मेपर्यंत वाढविण्यात आली. व्हॉट्सअ‍ॅपने ही अंतिम मुदत मागे घेतली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे युजर्स जो कंटेंट व्हॉट्सॲपवर अपलोड करतात, सबमिट करतात, सेंड वा रिसीव्ह करतात त्या सगळ्याचा वापर व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी फेसबुक करू शकणार आहे.

युजर आयडी, डिव्हाइस आयडी, शॉपिंग हिस्ट्री, फोन नंबर, ई-मेल पत्ता, पेमेंट इन्फो, प्रॉडक्ट इंटरॅक्शन, यूझर कंटेंट इत्यादी माहिती व्हॉट्सॲपकडे शेअर होणार आहे. त्यामुळे युजर्सच्या प्रायव्हसीवर गदा येणार आहे. या सर्व कारणांमुळे व्हॉट्सॲपच्या या प्रायव्हसी पॉलिसीला प्रखर विरोध होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतिम मुदतीपासून माघार घेतली असली तरी युजरला पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठीचा मेसेज वारंवार येत राहील. पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी युजरला आग्रह धरला जाईल.

जे युजर्स पॉलिसीचा स्वीकार करणार नाही, त्यांचे अकाउंट डिलीट होईल, असे आधी सांगितले गेले होते; परंतु तसे आता होणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

WhatsApp मध्ये आता लवकरच स्टेट्स प्रमाणे पाठवण्यात आलेले मेसेज 24 तासांत आपोआप गायब होणार आहेत. सध्या पाठवण्यात आलेले मेसेज सात दिवसांनंतर आपोआप गायब होतात. मात्र आता कंपनी यात बदल करणार आहे.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप iOS व्हर्जनमध्ये नवीन फीचरची टेस्टिंग केली जात आहे. या फीचर द्वारे पाठवण्यात आलेले मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर 24 तासांच्या आत गायब होणार आहेत.

सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. मात्र हे व्हॉट्सअ‍ॅपवर जो व्यक्ती मेसेज पाठवतो तो हे सर्व ठरवू शकणार आहे. या फीचरला इनेबल करायचे की नाही हे पूर्णपणे युजरवर अवलंबून असणार आहे.

नव्या फीचरमध्ये 24 तासांसोबतच 7 दिवसांची सुविधा आधी प्रमाणे मिळत राहणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या डिसअपिरिंग मेसेज फीचरमध्ये सध्या 7 दिवसांची लिमिट दिली आहे. रिसिवर तुम्हाला मेसेज कॉपी सुद्धा करू शकता.

कंपनीने हे फीचर पर्सनल चॅट आणि ग्रुप चॅट दोन्हीसाठी जारी करण्यात आले होते. रिपोर्ट्च्या माहितीनुसार, नवीन फीचर भविष्यात अपडेट केले जाऊ शकते. जे iOS आणि Android सह सर्व प्लॅटफॉर्मसाठी जारी केले जाणार आहेत