शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

90Hz आणि 144Hz स्मार्टफोन डिस्प्लेमध्ये काय फरक आहे? परफॉर्मन्सवर कसा होतो? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:46 IST

आजकाल स्मार्टफोन खरेदी करताना लोक कॅमेरा, बॅटरी आणि प्रोसेसरसह डिस्प्ले रिफ्रेश रेटकडेही विशेष लक्ष देत आहेत.

आजकाल स्मार्टफोन खरेदी करताना लोक केवळ कॅमेरा, बॅटरी आणि प्रोसेसरकडेच नाही, तर डिस्प्ले रिफ्रेश रेटकडेही विशेष लक्ष देत आहेत. बाजारात आता 60Hz, 90Hz, 120Hz आणि 144Hz रिफ्रेश रेटचे फोन उपलब्ध आहेत. पण अनेक युजर्सना या आकड्यांमधील फरक आणि त्याचा फोनच्या परफॉर्मन्सवर होणारा परिणाम समजत नाही.

रिफ्रेश रेट म्हणजे काय?

डिस्प्लेचा रिफ्रेश रेट (Refresh Rate) म्हणजे स्क्रीन एका सेकंदात किती वेळा इमेज अपडेट करते.

उदा: 

90Hz डिस्प्ले प्रति सेकंद 90 वेळा इमेज अपडेट करतो.

144Hz डिस्प्ले प्रति सेकंद 144 वेळा इमेज अपडेट करतो.

रिफ्रेश रेट जितका जास्त, तितकी स्क्रीनवरील हालचाल अधिक स्मूद, फ्लुइड आणि नैसर्गिक दिसते.

90Hz डिस्प्लेचा अनुभव

90Hz डिस्प्ले मिड-रेंज स्मार्टफोन्समध्ये मिळतो. पारंपरिक 60Hz पेक्षा खूपच स्मूद अनुभव देतो. स्क्रोलिंग, स्वाइपिंग आणि अॅप ओपनिंग अधिक जलद आणि सुलभ होते.गेमिंगसाठीही योग्य, विशेषत: जे गेम्स हाय फ्रेम रेटला सपोर्ट करतात.बॅटरीचा वापर मर्यादित, त्यामुळे परफॉर्मन्स आणि पॉवरमध्ये उत्तम बॅलन्स मिळतो.

144Hz डिस्प्लेचा अनुभव

144Hz डिस्प्ले प्रामुख्याने फ्लॅगशिप किंवा गेमिंग स्मार्टफोन्समध्ये पाहायला मिळतो.हा 90Hz पेक्षा अधिक स्मूद आणि प्रतिसादक्षम असतो.हाय-एंड गेमिंग, तेज ग्राफिक्स व्हिडिओ आणि प्रोफेशनल टास्क्ससाठी परफेक्ट.विशेषतः PUBG Mobile, Free Fire, Call of Duty Mobile सारख्या गेम्समध्ये लेटन्सी कमी करून गेमिंग अनुभव आणखी सुधारतो.

बॅटरी आणि प्रोसेसरवरील परिणाम

रिफ्रेश रेट जितका जास्त, तितकी बॅटरीची खपत आणि प्रोसेसरवरील लोड वाढतो.

90Hz डिस्प्ले बॅटरी थोडी बॅटरी वापरतो.

144Hz डिस्प्ले अधिक पॉवर घेतो.

जर फोनमध्ये मोठी बॅटरी आणि दमदार प्रोसेसर नसेल, तर 144Hz चा फायदा कमी मिळू शकतो. म्हणूनच अनेक कंपन्या रिफ्रेश रेट स्विच (60Hz/90Hz/144Hz) देतात, जेणेकरून गरजेनुसार बॅटरी वाचवता येते.

कोणता पर्याय योग्य?

जर तुम्ही सामान्य युजर असाल, सोशल मीडिया, वेब ब्राउझिंग आणि अधूनमधून गेमिंग करणारे, तर 90Hz डिस्प्ले सर्वाधिक योग्य आणि किफायतशीर आहे.

पण जर तुम्ही हेवी गेमर असाल किंवा फोनवर सतत हाय-ग्राफिक्स काम करत असाल, तर 144Hz डिस्प्ले तुम्हाला एक वेगळाच प्रीमियम अनुभव देईल.

English
हिंदी सारांश
Web Title : 90Hz vs 144Hz Phone Displays: Performance Differences Explained Simply

Web Summary : Smartphones now boast 90Hz or 144Hz refresh rates. Higher refresh rates offer smoother scrolling and gaming. 144Hz excels in gaming, but consumes more battery. 90Hz balances performance and battery life, ideal for everyday use. Choose based on usage.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान