शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प इफेक्ट! पाकिस्तानी आयफोन घेताना रडणार; किडनीच काय घरदार विकले तरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 20:24 IST

अ‍ॅपल आपले फोन चीनमध्ये निर्माण करतो. चीनवर अमेरिकेने ५४ टक्के टेऱिफ लावले आहे. आधीच होते त्यात आणखी दोनदा वाढ झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टेरिफ वॉर आजपासून खऱ्या अर्थाने सुरु झाले आहे. ट्रम्पनी चीनवर १०४ टक्के कर लावला आहे, तर चीनने ही जोरदार प्रत्यूत्तर देत आधीच्या करात आणखी ८४ टक्क्यांची वाढ केली आहे. या नव्या टेरिफमुळे आयफोनच्या किंमती महाग होणार आहेत. याचा फटका असा की पाकिस्तानमध्ये आयफोनची किंमत १० लाख रुपये होण्याची शक्यता आहे. जोवर जुना स्टॉक आहे तोवर कमी दराने आयफोन मिळतील परंतू, नवीन आयफोनसाठी किडनीच नाही तर घरदार विकले तरी तेवढी किंमत जमा होताना मुश्कील होणार आहे. 

अ‍ॅपल आपले फोन चीनमध्ये निर्माण करतो. चीनवर अमेरिकेने ५४ टक्के टेऱिफ लावले आहे. आधीच होते त्यात आणखी दोनदा वाढ झाली आहे. यामुळे अ‍ॅपलकडे अ‍ॅकतर ही वाढीव किंमतीचे नुकसान झेलायचे किंवा त्याचा भार ग्राहकांवर टाकायचा असे दोन पर्याय आहेत. अ‍ॅपल काही केल्या आपल्याकडे हा भार घेणार नाही, कारण कंपनी कमी किंमतीत स्मार्टफोन बनविते आणि त्याच्या चार पाच पट किंमतीत विकते.

आयफोनच्या किंमतीत सध्या दहा टक्क्यांची घट झालेली आहे. अशातच भारत आणि पाकिस्तान दोन्ही अ‍ॅपल कंपनीसाठी महत्वाचे आहेत. जर कंपनीने हा टेरिफचा भार ग्राहकांवर टाकला तर आयफोनची किंमत जवळपास ४३ टक्क्यांनी वाढणार आहे. असे झाले तर पाकिस्तानात आयफोन प्रो मॅक्सची किंमत १० लाख रुपयांच्या पुढे जाणार आहे. सध्या आयफोन १६ ची किंमत २ लाख २४ हजार पाकिस्तानी रुपये आहे. 

आयफोन १६ प्रो मॅक्सची किंमत अमेरिकेच्या किंमतीच्या तुलनेत ४,५०,००० पाकिस्तानी रुपये आहे. हा फोन पाकिस्तानात आल्यावर आणखी त्याची किंमत वाढते. पाकिस्तानमध्ये आधीच अमेरिकेपेक्षा ४० टक्के जास्त किंमत असते. हे पाहता आयफोनच्या किंमती या अमेरिकेपेक्षा ८३ टक्के जास्त असणार आहेत. म्हणजेच आयफोन १६ जवळपास सहा लाखांच्या आसपास जाणार आहे. तर आयफोन मॅक्स प्रो १० लाखांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलPakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प