शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! मोबाईल युजर्सना सरकारने केलं अलर्ट; तुम्हालाही 'असा' कॉल आलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 16:07 IST

सरकारी एजन्सी ट्रायने याबाबत आता स्पष्ट माहिती दिली आहे.

अलीकडे काही मोबाईल युजर्सना कॉल येत आहेत ज्यामध्ये लोकांना त्यांचे मोबाईल नंबर बंद करण्याची धमकी दिली जात आहे. हे कॉलर्स  टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचे (TRAI) कर्मचारी किंवा त्याच्या संबंधित एजन्सीचे सदस्य असल्याचं सांगत आहेत. सरकारी एजन्सी ट्रायने याबाबत आता स्पष्ट माहिती दिली आहे.

ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एजन्सी कोणत्याही मोबाईल युजर्सना त्यांचा नंबर ब्लॉक किंवा डिस्कनेक्ट करण्यासाठी कॉल करत नाही. तसंच त्यांनी कोणत्याही एजन्सीला तसं करण्यास सांगितलं नाही. असे कॉल स्कॅमर्सकडून केले जात आहेत आणि त्यांच्यापासून सावध राहा.

TRAI ने ट्विटरवर याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात एक प्रेस रिलीज शेअर केलं आहे. ट्रायच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी ही प्रेस रिलीझ शेअर केली आहे. स्कॅमर्स सर्वसामान्य लोकांची फसवणूक करून त्यांच्या नावावर सिम घेण्याची धमकी देत ​​आहेत असं प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे.  

TRAI चे सेक्रेटरी व्ही रघुनंदन यांनी TRAI च्या Telecom Commercial Communication Customer Preferences Regulation (TCCCPR) 2018 नुसार, सर्व्हिस प्रोव्हायडर फ्रॉड कॉल्स आणि असे मेसेज पाठवणाऱ्या नंबरवर कारवाई करू शकतात असं म्हटलं आहे.

सर्वसामान्य व्यक्ती थेट नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर जाऊ शकते किंवा सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करू शकते. अलीकडच्या काळात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधत आहेत. हल्ली स्कॅमर्स कधी पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवतात, तर कधी पार्सल किंवा कुरिअरचे आमिष दाखवतात. इतकेच नाही तर लोकांना घाबरवण्यासाठी सीबीआय, कस्टम ऑफिसर असल्याचं सांगून फोन करत आहेत.