Sony ने धक्कादायक निर्णय घेतला! स्वत: बनविणार नाही 'Bravia' टीव्ही; दुसऱ्या कंपनीला दिले काम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 09:50 IST2026-01-22T09:49:43+5:302026-01-22T09:50:14+5:30

Sony Bravia TV Update: Sony आता स्वतः टीव्ही उत्पादन करणार नाही. जपानी दिग्गज सोनीने चीनच्या TCL कंपनीशी टीव्ही मॅन्युफॅक्चरिंगसाठी करार केला आहे. पहा काय होणार परिणाम.

Sony Bravia TV Update: Sony takes a shocking decision! It will not manufacture 'Bravia' TVs itself; it has given the job to another company... | Sony ने धक्कादायक निर्णय घेतला! स्वत: बनविणार नाही 'Bravia' टीव्ही; दुसऱ्या कंपनीला दिले काम...

Sony ने धक्कादायक निर्णय घेतला! स्वत: बनविणार नाही 'Bravia' टीव्ही; दुसऱ्या कंपनीला दिले काम...

टीव्ही जगतातील प्रिमियम ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Sony (सोनी) कंपनीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सोनी आता आपले जगप्रसिद्ध 'Bravia' स्मार्ट टीव्ही स्वतः मॅन्युफॅक्चर (उत्पादन) करणार नाही. याऐवजी, सोनीने चीनमधील प्रसिद्ध टीव्ही उत्पादक कंपनी TCL शी करार केला असून, आता सोनीचे टीव्ही TCL च्या प्लँटमध्ये तयार केले जाणार आहेत.

सोनी आपल्या टीव्हीचे डिझाइन, सॉफ्टवेअर आणि तांत्रिक संशोधन स्वतःकडेच ठेवणार आहे. मात्र, टीव्हीचे असेंबलिंग आणि प्रत्यक्ष उत्पादन करण्याची जबाबदारी आता TCL कडे सोपवण्यात आली आहे. या धोरणात्मक बदलामुळे सोनीच्या टीव्ही निर्मितीच्या खर्चात मोठी कपात होणार आहे, ज्याचा फायदा भविष्यात ग्राहकांना स्वस्त किमतीच्या स्वरूपात मिळू शकतो.

का घेतला हा निर्णय?
खर्च कमी करणे: सॅमसंग आणि एलजी सारख्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या स्पर्धेमुळे सोनीला आपल्या टीव्हीची किंमत स्पर्धात्मक ठेवणे गरजेचे होते. TCL ही सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टीव्ही उत्पादक कंपनी बनली आहे. त्यांच्याकडे उत्पादनासाठी लागणारी प्रगत यंत्रणा असल्याने सोनीने हा मार्ग निवडला आहे.  सोनीने स्पष्ट केले आहे की, जरी उत्पादन बाहेर होत असले तरी 'ब्रँड सोनी'ची गुणवत्ता आणि प्रिमियम अनुभव युजर्सना पूर्वीप्रमाणेच मिळत राहील.

भारतीय युजर्सवर काय परिणाम होणार?
भारतात सोनी ब्राव्हिया टीव्हीची मोठी बाजारपेठ आहे. या नवीन करारामुळे भारतीय ग्राहकांना आगामी काळात सोनीचे प्रिमियम टीव्ही थोड्या कमी किमतीत पाहायला मिळू शकतात. मात्र, 'मेड इन जपान' चा टॅग शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही बातमी निराशाजनक ठरू शकते.

Web Title : सोनी ने ब्राविया टीवी उत्पादन का काम टीसीएल को सौंपा।

Web Summary : सोनी अब ब्राविया टीवी का निर्माण नहीं करेगा, उत्पादन टीसीएल को सौंपा गया है। इसका उद्देश्य लागत में कटौती करना है, जिससे भारतीय उपभोक्ताओं के लिए कीमतें कम हो सकती हैं। डिजाइन सोनी के पास रहेगा।

Web Title : Sony outsources Bravia TV production; TCL to manufacture them.

Web Summary : Sony will no longer manufacture Bravia TVs, outsourcing to TCL. This aims to cut costs, potentially lowering prices for Indian consumers. Design remains with Sony.