शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

छोटुसा टॅबलेट! 8.7-इंचाच्या स्क्रीनसह Realme Pad Mini, फक्त 'इतकी' आहे किंमत  

By सिद्धेश जाधव | Updated: April 4, 2022 19:21 IST

Realme Pad Mini टॅबलेट 8MP कॅमेरा, 8.7 इंचाचा डिस्प्ले, आणि 6400mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.  

Realme Pad Mini टॅबलेट फिलिपिन्समध्ये सादर करण्यात आला आहे. हा बजेट फ्रेंडली टॅबलेट 6400mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग, Unisoc T616 प्रोसेसर, 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह बाजारात आला आहे. या फीचर्सना साजेशी किंमत देखील कंपनीनं ठेवली आहे. हा डिवाइस भारतात कधी येईल याची माहिती मात्र मिळाली नाही.  

Realme Pad Mini चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Pad Mini मध्ये 8.7-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1340 x 800 पिक्सल रेजलूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं Unisoc T616 प्रोसेसरचा वापर केला आहे. सोबत 4GB पर्यंत RAM आणि 64GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा डिवाइस अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. 

फोटोग्राफीसाठी या छोट्या टॅबमध्ये दोनच कॅमेरे मिळतात. त्यातील 8MP चा सेन्सर कंपनी टॅबच्या मागच्या बाजूस दिला आहे. तर फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा सेन्सर मिळतो. या टॅबलेटमध्ये 6400mAh मोठी बॅटरी मिळते, जी 18W फास्ट चार्जिंग स्पिडनं चार्ज करता येते. याचे वजन 372 ग्राम आहे. Realme Pad पाठोपाठ Realme Pad Mini चे देखील भारतात आगमन होऊ शकते.  

Realme Pad Mini ची किंमत  

Realme Pad Mini (LTE) व्हर्जन 3GB RAM आणि 32GB स्टोरेजसह फिलिपिन्समध्ये P 9,900 मध्ये सादर करण्यात आला आहे, जे 14,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होतात. या टॅबच्या टॉप एन्ड व्हेरिएंट 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ज्याची किंमत P 11,990 आहे, जे 17,600 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होतात. 

टॅग्स :realmeरियलमीtabletटॅबलेटtechnologyतंत्रज्ञान