शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Realme GT Neo 2 5G च्या भारतीय लाँचचा मुहूर्त ठरला; या तारखेला येणार हा धमाकेदार फोन 

By सिद्धेश जाधव | Updated: October 7, 2021 13:12 IST

Upcoming 5G Phone In India Realme GT Neo 2: Realme GT Neo 2 स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतात सादर केला जाईल. 13 ऑक्टोबरला दुपारी 12.30 मिनीटांनी हा लाँच इव्हेंट सुरु होईल.

काही दिवसांपूर्वी रियलमीने जागतिक बाजारात आपला दमदार फोन सादर केला होता. आता कंपनीने या फोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्टनुसार Realme GT Neo 2 5G हा फोन पुढील आठवड्यात भारतीय चाहत्यांच्या भेटीला येईल. या फोनच्या लाँचसाठी 13 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.  

Realme GT Neo 2 गेल्याच महिन्यात टेक मार्केटमध्ये लाँच झाला होता त्यामुळे या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. या फोनचा लाँच इव्हेंट 13 ऑक्टोबरला दुपारी 12.30 मिनिटांनी सुरु होईल. ज्याचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि यूट्यूब चॅनेल वरून बघता येईल.  

स्पेसिफिकेशन्स  

Realme GT Neo 2 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 870 हा 5G चिपसेट आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय 2.0 वर चालतो. या डिवाइसमध्ये 12GB पर्यंतचा RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. 

Realme GT Neo 2 स्मार्टफोन Samsung E4 Display सह बाजारात आला आहे. या फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या डिस्प्लेचा आकार 6.62 इंच आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश, 600हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1300निट्स ब्राईटनेस आणि 500000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो, तसेच या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.    

रियलमी जीटी नियो2 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 64MP चा मुख्य सेन्सर, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह यात 65W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.     

भारतीय किंमत 

लिक्सनुसार Realme GT Neo 2 5G फोनची भारतातील किंमत Realme X7 Max सारखी असू शकते. त्यामुळे या फोनचा 8GB RAM + 128GB व्हेरिएंट 26,999 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. तर 12GB RAM + 256GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये असू शकते. परंतु ही फक्त लीक किंमत आहे, फोन लाँचनंतर आपल्याला खऱ्या किंमतीची माहिती मिळू शकते. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान