शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

अलर्ट! ओटीपीने होणारी फसवणूक थांबणार; तुम्हाला मिळणार तत्काळ धोक्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 10:19 IST

रिझर्व्ह बँकेने फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट व्यवहारासाठी अतिरिक्त प्रमाणीकरणावर भर दिला आहे

नवी दिल्ली : ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी ओटीपी वापरला जातो. असे असताना फसवणूक करणारे यशस्वी होतात. अनेक वेळा लोक स्वत: ओटीपी देतात, तर काही वेळा फसवणूक करणारे मोबाइल हॅक करून फसवणूक करतात. 

ओटीपीच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारने अलर्ट सिस्टम आणण्याचा विचार सुरू केला आहे. यासाठी गृह मंत्रालय, एसबीआय कार्ड आणि टेलिकॉम ऑपरेटर एकत्रितपणे काम करत आहेत. या प्रणालीमध्ये फसवणूक करणाऱ्याने ग्राहकाचा ओटीपी घेतल्यास त्या व्यक्तीला धोक्याची सूचना दिली जाईल आणि फसवणूक थांबवता येईल.

ओटीपी मिळाला तरी फसवणूक होणार नाही रिझर्व्ह बँकेने फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट व्यवहारासाठी अतिरिक्त प्रमाणीकरणावर भर दिला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, फसवणूक टाळण्यासाठी दोन पर्यायांवर काम केले जात आहे. ओटीपी डिलिव्हरीचे ठिकाण आणि ग्राहकाच्या सिमच्या लोकेशनमध्ये काही फरक असल्यास, एकतर डिव्हाइसवर एक अलर्ट पॉपअप केला जाईल किंवा ओटीपी पूर्णपणे ब्लॉक केला जाईल. यामुळे सायबर गुन्हेगारांना पेमेंट करण्यासाठी ओटीपी मिळाला तरी ते फसवणूक करू शकणार नाहीत.

नेमके काय करणार केंद्र सरकार? सिस्टममध्ये ग्राहकाच्या नोंदणीकृत पत्त्यासह त्याच्या सिमचे ठिकाण आणि ओटीपी कॉल केलेल्या ठिकाणाचा मेळ बसविण्यात येईल. त्यांच्यामध्ये काही फरक आढळल्यास, ग्राहकाला एक अलर्ट पाठविला जाईल की त्याची फसवणूक होऊ शकते. या योजनेनुसार, टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीने ग्राहकांचा डेटाबेस तपासल्यानंतरच ओटीपी पाठवला जाईल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानfraudधोकेबाजी