शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 11:50 IST

Call Merging Scam Alert: 'कॉल मर्जिंग स्कॅम' या नवीन सायबर फसवणुकीत OTP कसा चोरला जातो? स्कॅमरची कार्यपद्धती आणि या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी NPCI ने दिलेल्या तातडीच्या सूचना मराठीत वाचा.

नवी दिल्ली: मिस्ड कॉल फ्रॉड आणि डिजिटल अटक यांसारख्या सायबर फसवणुकीचे प्रकार आता मागे पडू लागले आहेत. आता सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा एक नवा आणि अतिशय धोकादायक मार्ग शोधला आहे, तो म्हणजे 'कॉल मर्जिंग स्कॅम' (Call Merging Scam). नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि प्रमुख बँकांनी या नवीन फसवणुकीबद्दल नागरिकांना तातडीचा इशारा जारी केला आहे.

या स्कॅममध्ये, सायबर चोरटे 'कॉल मर्ज' किंवा 'कॉन्फरन्स कॉल' या सामान्य मोबाईल फीचरचा गैरवापर करून नकळतपणे वन-टाइम पासवर्ड  मिळवतात आणि काही सेकंदांतच खाते रिकामे करतात.

'कॉल मर्जिंग स्कॅम' नेमका कसा चालतो?कॉल मर्जिंग स्कॅम हा सोशल इंजिनिअरिंग तंत्रावर आधारित आहे, जो सामान्यतः खालीलप्रमाणे होतो:

स्कॅमर तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल करतो आणि सांगतो की तुमचा नंबर त्याला तुमच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून किंवा मित्राकडून मिळाला आहे. तो बोलण्यातून तुमचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतो. यानंतर, स्कॅमर तुम्हाला सांगतो की तो 'मित्र' दुसऱ्या नंबरवरून तुम्हाला कॉल करत आहे आणि तुम्हाला कॉल मर्ज करण्याची विनंती करतो.

इथेच फसतो...

प्रत्यक्षात, हा 'दुसरा कॉल' मित्राचा नसतो, तर तो तुमच्या बँक खात्यातून एखादा व्यवहार सुरू करण्यासाठी मागवलेला बँकेचा स्वयंचलित OTP व्हेरिफिकेशन कॉल असतो. तुम्ही जसा कॉल मर्ज करता, तसा बँकेचा OTP कॉलही तुमच्या संभाषणात जोडला जातो. तुमची माहिती त्याने आधीच इटरनेटवरून मिळवून टाकलेली असते, तो फक्त ओटीपीची वाट पाहत असतो. कॉलवरील ओटीपी ऐकताच तो टाकतो आणि लगेचच तुमच्या खात्यातून पैसे वळते केले जातात. सावध तो सुखी...अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही कॉलसोबत दुसरा कॉल मर्ज करण्याची विनंती केल्यास, त्याला त्वरित नकार द्या. जर कोणी बँक अधिकारी किंवा ओळखीच्या व्यक्तीचा हवाला देत असेल, तर कॉल कट करून अधिकृत कस्टमर केअर नंबरवर किंवा त्या मित्राला दुसऱ्या माध्यमातून संपर्क करून ओळख पडताळून पाहा. बँक किंवा कोणतीही वित्तीय संस्था तुम्हाला फोनवर ओटीपी (OTP) किंवा पिन (PIN) कधीही विचारत नाही. असा कोणताही प्रश्न विचारल्यास तो स्कॅम समजा. तुम्हाला न केलेल्या व्यवहाराचा OTP आल्यास किंवा कोणत्याही संशयास्पद हालचाल दिसल्यास, त्वरित आपल्या बँकेला कळवा आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन (National Cybercrime Helpline) १९३० वर तक्रार नोंदवा.

English
हिंदी सारांश
Web Title : Call Merging Scam: New Fraud Threat Empties Bank Accounts Instantly

Web Summary : A new 'Call Merging Scam' targets bank accounts by exploiting the call merge feature. Scammers gain trust, merge the call with an OTP verification call, and steal the OTP to transfer funds. Banks advise caution, urging people to reject suspicious merge requests and verify requests.
टॅग्स :fraudधोकेबाजी