शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिला 5 जी स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला लाँच होणार, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 19:39 IST

'या स्मार्टफोनची टेकनिक जगभरातील जवळपास प्रत्येक विकसित देशात उपलब्ध आहे'

ठळक मुद्देस्मार्टफोनची किंमत जवळपास 50 हजार रुपये असण्याची शक्यताकोरोना व्हायरसची धास्ती, जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट रद्द!'या स्मार्टफोनची टेकनिक जगभरातील जवळपास प्रत्येक विकसित देशात उपलब्ध आहे'

नवी दिल्ली : भारतातील पहिला 5 जी स्मार्टफोन येत्या 24 फेब्रुवारीला लाँच होणार आहे. स्मार्टफोन तयार करणारी चीनमधील 'Realme' या कंपनीने या 5 जी स्मार्टफोनच्या लाँचिंगची पूर्ण तयारी केली आहे. कंपनीच्या अधिकृत सुत्रांच्या माहितीनुसार, या स्मार्टफोनची किंमत जवळपास 50 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, "मोबाईलच्या क्षेत्रात 2018 मध्ये पाऊल टाकणारी कंपनी येत्या 24 फेब्रुवारीला भारतात पहिला 5 जी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, सध्या देशात 5 जीचे नेटवर्क नाही आहे." 'Realme'चा हा स्मार्टफोन 865 स्नॅपड्रॅगन चिपसेटसोबत मार्केटमध्ये येणार आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत जवळपास 50 हजार रुपये असणार आहे, असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

मोबाईल फोन्सची तुलना करणारी एक वेबसाइटचा अंदाज आहे की, कमी चिपसेट आवृत्तीसोबत 5 जी स्मार्टफोनची किंमत 25,790 रुपये प्रति युनिटवर उपलब्ध होऊ शकते. कंपनी भविष्यातील दृष्टीकोण पाहून उत्पादन करू इच्छिते. ज्यामुळे जगाभरातील लोक याचा वापर करू शकतील. या स्मार्टफोनची टेकनिक जगभरातील जवळपास प्रत्येक विकसित देशात उपलब्ध आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले. 

'Realme'द्वारे एक्स 50 प्रो 5 जी स्मार्टफोन भारत आणि स्पेनमध्ये लाँच करण्यात येईल. याचबरोबर, चीनमधील एक नवीन स्मार्टफोन ब्रांड iQOO 3 सुद्धा 25 फेब्रुवारीला आपल्या 5 जी स्मार्टफोनची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

कोरोना व्हायरसची धास्ती, जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट रद्द!चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या कोरोना व्हायरसचा फटका टेक इंटस्ट्रीला सुद्धा बसला आहे. याबाबतचा धोका लक्षात घेऊन 'जीएसएमए'ने(GSMA) जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2020 (Mobile World Congress 2020) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसएमए कंपनीकडून गेल्या कित्येक वर्षांपासून या इव्हेंटचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, नोकिया, फेसबुक, विवो, सोनी आणिअॅमेझॉन यासारख्या कंपन्यांनी आधीची या इव्हेंटमधून बॅकआऊट केले आहे. कोरोना व्हायरसची भीषणता लक्षात घेऊन आमच्या कर्मचारी आणि पार्टनर्सच्या सुरक्षतेच्या दृष्टीने या इव्हेंटमध्ये भाग घेतला नसल्याचे या कंपन्यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल