Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजच्या युगात स्वयंचलित तंत्रज्ञानाच्याकार ही केवळ चित्रपटातील कल्पना राहिलेली नाही, तर ती प्रत्यक्षात रस्त्यावर उतरू लागली आहे. स्वयंचलित कार म्हणजे अशी गाडी जी माणसाविना स्वतः रस्ता ओळखते, आजूबाजूची परिस्थिती समजून घेते आणि योग्य निर्णय घेऊन सुरक्षितपणे पुढे चालत राहते. या गाड्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेन्सर्स, कॅमेरे आणि प्रगत संगणकीय प्रणाली वापरली जाते. जगभरात टेस्ला, वायमो आणि टोयोटा यांसारख्या कंपन्या या तंत्रज्ञानावर सातत्याने संशोधन करत आहेत.
गाडीचे डोळे- सेन्सर्स आणि कॅमेरे
स्वयंचलित कारमध्ये अनेक सेन्सर्स लागलेले असतात : LIDAR (Light Detection and Ranging) - लेझरच्या मदतीने आजूबाजूचा थ्री डी नकाशा तयार करता येतो.
Radar - समोरील वाहनाचा वेग आणि अंतर मोजता येतो.
कॅमेरे - समोर, आजूबाजूला लागलेले सिग्नल, रस्त्यावरील फलक, पादचारी हे सर्व कॅमेरे ओळखतात. आणि हा सर्व डेटा संगणकाकडे पुढील प्रोसेससाठी पाठवला जातो.
या दरम्यान, एआय मेंदू निर्णय कसा घेतो?
गाडीतील संगणक AI वापरून पुढे कोणते वाहन आहे, किती अंतरावर उभे आहे.? सिग्नल लाल आहे का हिरवा आहे.?पादचारी रस्ता ओलांडतो आहे की उभा आहे.? हे सर्व ओळखतोआणि सेकंदाच्या आत निर्णय घेतो. ब्रेक लावायचा, वेग वाढवायचा की वळायचे हे त्याला त्या क्षणीच समजते.
जीपीएस आणि नकाशे
जीपीएस आणि डिजिटल मॅप्समुळे गाडीला आपले स्थान आणि गंतव्य माहिती असते. त्यामुळे योग्य मार्ग निवडणे अगदी सोयीचे होते.
कंट्रोल सिस्टीम कुठल्या?
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या सर्व प्रक्रियेदरम्यान निर्णय घेतो. मात्र, त्यानंतरच्या महत्त्वाच्या कंट्रोल सिस्टीम.ब्रेक सिस्टीम.स्टेअरिंग.एक्सेलरेटर.
हे सर्व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नियंत्रित होतात. काही कंपन्या या तंत्रज्ञानावर संशोधन करत आहेत.
मूलबोध
स्वयंचलित कारमुळे आपोआपच अपघात कमी होऊ लागतात. ट्रॅफिक नियंत्रण सुधारण्यास मदत होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होते. इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ लागते. मात्र हे सर्व बघत असताना अजूनही कायदे, सुरक्षितता आणि तांत्रिक अडचणींवर काम सुरु आहे.
Moral
Autonomous Cars use Artificial Intelligence, sensors, cameras, radar, and GPS to drive without a human driver. They analyze the surroundings, make decisions, and control the vehicle automatically. Technology is powerful, but responsibility and safety must always come first.
- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)
Web Summary : Self-driving cars use AI, sensors, and GPS to navigate roads safely. Companies like Tesla and Waymo are improving this technology. AI analyzes surroundings and makes decisions for braking, acceleration, and steering, promising reduced accidents and improved efficiency. Safety remains paramount.
Web Summary : स्वचालित कारें सुरक्षित रूप से सड़कों पर नेविगेट करने के लिए एआई, सेंसर और जीपीएस का उपयोग करती हैं। टेस्ला और वायमो जैसी कंपनियां इस तकनीक में सुधार कर रही हैं। एआई आसपास के वातावरण का विश्लेषण करता है और ब्रेकिंग, एक्सीलरेशन और स्टीयरिंग के लिए निर्णय लेता है, जिससे दुर्घटनाओं में कमी और बेहतर दक्षता का वादा किया जाता है। सुरक्षा सर्वोपरि है।