शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

इंटरनेटशिवाय करता येणरा चॅटिंग; जॅक डोर्सीने आणले नवीन ‘Bitchat’ App, पाहा फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:04 IST

Jack Dorsey : ट्विटर आणि ब्लॉक सारख्या कंपन्यांचे संस्थापक जॅक डोर्सी पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या जगात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Jack Dorsey : ट्विटर आणि ब्लॉक सारख्या कंपन्यांचे संस्थापक जॅक डोर्सी पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या जगात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी त्यांनी एक असे अॅप आणले आहे, जे इंटरनेटशिवाय, मोबाईल नंबरशिवाय आणि ईमेलशिवाय चॅटिंग करण्यास सक्षम आहे. या अॅपचे नाव Bitchat आहे. हे अॅप एक डिसेंट्रलाइज्ड मेसेजिंग सिस्टीम आहे, जे ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) तंत्रज्ञानावर काम करते.

काय आहे बिटचॅट ?बिटचॅट हे एक मोबाइल मेसेजिंग अॅप आहे, जे इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कशिवाय काम करेल. हे पीअर-टू-पीअर मेसेजिंगला सपोर्ट करते. याचा अर्थ असा की, एक मोबाइल थेट दुसऱ्या मोबाईलशी कनेक्ट होतो आणि मेसेज पाठवतो. हे अॅप जॅक डोर्सीचा वीकेंड प्रोजेक्ट मानले जातोय, परंतु या तंत्रज्ञानाने आणि संकल्पनेने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

बिटचॅट कसे काम करते?

बिटचॅट ब्लूटूथ मेश नेटवर्कद्वारे डिव्हाइस-टू-डिव्हाइस कनेक्शन तयार करते. हे नेटवर्क 300 मीटरपेक्षा जास्त अंतरावर काम करते. 

मेसेज multi-hop सिस्टमद्वारे पाठवले जातात. म्हणजेच, जर दोन डिव्हाइसेस दूर असतील तर मेसेज इतर मोबाइल डिव्हाइसद्वारे फॉरवर्ड केला जातो.

मेसेज युजरच्या डिव्हाइसवर तात्पुरत्या मेमरीमध्ये सेव्ह केला जातो. जर रिसिव्हर ऑफलाइन असेल, तर मेसेज नंतर वितरित केला जातो.

बिटचॅटचे सुरक्षा धोरण काय आहे?

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन: Curve25519 + AES-GCM अल्गोरिथमद्वारे डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो.

फोन नंबर किंवा ईमेल आवश्यक नाही: यामध्ये मोबाइल नंबर किंवा ईमेल आवश्यक नाही, म्हणजेच ते पूर्णपणे खाजगी आहे.

सर्व्हर नाही, केंद्रीय नियंत्रण नाही: कोणताही केंद्रीय सर्व्हर नाही, म्हणून अॅप सेन्सॉरशिप-मुक्त आहे आणि नेटवर्क ब्लॉकिंगपासून पूर्णपणे सुरक्षित आहे.

सध्या बिटचॅट कुठे उपलब्ध आहे?सध्या, हे अॅप Apple TestFlight द्वारे iOS वापरकर्त्यांसाठी बीटा व्हेर्जनमध्ये लॉन्च केले गेले आहे. बीटा अॅक्सेसनंतर ते येत्या काळात अँड्रॉइड आणि इतर प्लॅटफॉर्मवर देखील आणले जाऊ शकते. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपInstagramइन्स्टाग्रामTwitterट्विटर