शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या अनैतिक संबंधाचा संशय आला; पती थेट पोलीस ठाण्यात पोहोचला, म्हणाला: 'मी बायकोला मारलं!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 14:02 IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने लोखंडी रॉडने हल्ला करत तिला मारहाण केली, अन् त्यातच..

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने लोखंडी रॉडने हल्ला करत तिची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वतःहून पोलीस ठाणे गाठले आणि आपण आपल्या पत्नीची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

स्वतःच पोहोचला राधा नगर पोलीस ठाण्यात अन्.. 

फतेहपूर जिल्ह्यातील राधा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाऊपूर पुलाजवळ राहणारा अजय सिंह याने रविवारी सकाळी पोलीस ठाण्यात हजर होऊन एक धक्कादायक कबुली दिली. "मी माझ्या पत्नीची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केली आहे," असे त्याने पोलिसांना सांगितले. अजयचे बोलणे ऐकून पोलिसांना विश्वास बसेना, पण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

पोलिसांना झाऊपूर पुलाजवळील अजय सिंह आणि त्याची ३० वर्षीय पत्नी शिखा सिंह यांच्या घरात शिखा यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपी अजय सिंहने म्हटले की, त्याची पत्नी शिखाचे अनैतिक संबंध होते. वारंवार समजावूनही ती ऐकत नव्हती. याच कारणामुळे शनिवारी रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने लोखंडी रॉडने तिच्यावर हल्ला करून तिची हत्या केली.

सीओ जाफरगंज दुर्गेशदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक घटनास्थळी हजर आहे. पोलिसांनी शिखा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी पती अजय सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Suspecting infidelity, husband murders wife, confesses at police station.

Web Summary : In Fatehpur, Uttar Pradesh, a husband, suspecting his wife's infidelity, brutally murdered her with an iron rod. He then confessed to the police, causing shock in the area. Police are investigating; the body has been sent for post-mortem.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार