शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यानगर जिल्ह्यातील चार पालिकांची निवडणूक पुढे ढकलली; नवीन कार्यक्रमानुसार होणार निवडणूक प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 13:38 IST

अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा पालिकांसाठी २८९ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार होती परंतु निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवारांविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे.

अहिल्यानगर - जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने संपूर्ण निवडणूक नवीन कार्यक्रमानुसार होणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा पालिकांसाठी २८९ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार होती परंतु निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवारांविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांच्या अपीलावर २३ नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर आदेश पारीत झाले असतील, त्या ठिकाणीच्या संबंधित सदस्यांच्या जागेकरिता तसेच अध्यक्षपदाबाबत निकाल असलेल्या नगरपरिषद-नगरपंचायतीच्या निवडणुका नवीन कार्यक्रमानुसार होणार आहेत.

जिल्ह्यातील पाथर्डी, नेवासा, कोपरगाव व देवळाली या चार पालिकांच्या नगराध्यक्षसह सदस्य पदावर न्यायालयात अपील दाखल झाले होते. त्यामुळे आयोगाच्या नवीन अध्यादेशानुसार येथे निवडणूक प्रक्रिया नव्याने राबवली जाणार आहे तसेच जिल्ह्यातील श्रीगोंदा, श्रीरामपूर व राहुरी पालिकेतील एक सदस्य जागा व जामखेड व संगमनेर पालिकेच्या दोन सदस्यांच्या जागेची निवडणूक नवीन कार्यक्रमानुसार होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आज दुपारी बैठक घेऊन या संदर्भातील अंतिम निर्णय घेणार आहेत. 

पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जारी करतील. १० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी मुदत, ११ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप तसेच निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध केले जाईल. २० डिसेंबर रोजी मतदान, तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ahmadi Nagar Municipal Elections Postponed; New Schedule Announced

Web Summary : Elections for four Ahmadi Nagar municipalities are postponed due to court appeals regarding candidates. A revised schedule is announced: voting on December 20th and counting on December 21st.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Ahilyanagarअहिल्यानगर