How to save from the harassment on WhatsApp? Learn tips and stay safe | WhatsApp वरील समाजकंटकांपासून कसे वाचाल? जाणून घ्या टिप्स अन् रहा सुरक्षित

WhatsApp वरील समाजकंटकांपासून कसे वाचाल? जाणून घ्या टिप्स अन् रहा सुरक्षित

आज डिजिटलच्या जमान्यामध्ये फ्रॉड कॉल, फसवणुकीचे प्रकार खूपच वाढले आहेत. पैशांची अफरातफर वेगळीच पण एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे अश्लिल फोटो, व्हिडीओ काढून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करणे, पैसे उकळणे किंवा त्याहून वाईट म्हणजे लैंगिक सुखाची मागणी करणे आदी प्रकार केले जात आहेत. यापासून वाचण्यासाठी काही प्रमाणात सावधगिरी बाळगल्यास त्यापासून तुम्ही वाचू शकाल. जरी तुम्ही काळजी घेत असलात तरीही तुमच्या मित्र मैत्रिणींपैकी कोणालातरी सावध केले तरी त्यांच्यासाठी ते खूप उपयुक्त ठरेल. 

काय काळजी घ्याल?

  • अननोन नंबर म्हणजेच ओळखीच्या व्यक्तींव्यतीरिक्त जर तुम्हाला कोणाचा माहित नसलेल्या नंबर वरून फोन आला तर तो उचलू नका. व्हॉट्सअॅपवर असे कॉल येतात. व्हिडीओ क़ॉलही येतात. जर घाई गडबडीत तुम्ही तो फोन उचलला तर तो डिस्कनेक्ट म्हणजेच कट करने तुमच्या फायद्याचे ठरेल. कारण तो कॉल टेलिमार्केटिंग करणारे किंवा फसवणूक करणाऱ्यांचा असू शकतो. 
     

जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग

  • जर तुम्हाला भारतीय नंबरपेक्षा वेगळ्या नंबरवरून कॉल आला तर सावध व्हा. जर तुमची भावंडे किंवा मित्रांपैकी कुणी परदेशात नसेल तर तुम्हाला फोन कोण करणार? हे फ्रॉड करणारेच असतात. भारतीय नंबर हा +91 पासून सुरु होतो. तर परदेशातील नंबर हे +11 किंवा तत्सम नंबरवरून सुरु होतात. असे कॉल उचलू नका. 

    भारीच! App ओपन न करता WhatsApp वर करता येतो झटपट मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?

 

  • जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून व्हिडीओ कॉल आला आणि जर तो कॉल तुम्हाला उचलायचा असेल तर पहिला सेल्फी कॅमेरा बंद करा. जर गरज पडली तर नंतर सेल्फी कॅमेरा सुरु करून तुम्ही त्या व्यक्तीशी बोलू शकता. फोन आल्यावर आपण कोणत्याही अवस्थेत असू शकतो. अशावेळी समोरच्याने जर व्हिडीओ रेकॉर्ड केला तर आपसूकच तुम्ही त्याचे शिकार बनू शकता. 

 

WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की...

ग्रुप
काही जण असेच कोणाचेही नंबर एखाद्या वाईट विषयाच्या, अश्लिल किंवा तुम्हाला नको असलेल्या ग्रुपमध्ये अॅड करतात. अशावेळी तुम्ही तो ग्रुप सोडलेलाच बरा. तसेच ज्याने तुम्हाला त्या ग्रुपमध्ये अॅड केले तो पुन्हा करेल, यामुळे त्यालाही ब्लॉक केल्यास फायद्याचे ठरेल. 


प्रोफाईल पिक्चर
अनेकांना प्रोफाईलवर फोटो अपडेट करत राहण्याची सवय असते. ती वाईट नाही. परंतू आज मी इथे आहे, उद्या तिथे असेन आदी स्टेटस किंवा ते दर्शविणारे फोटो तुम्हाला घातक ठरू शकतात. शक्यतो आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ओळखीचेच नंबर असतात. त्यामुळे आपल्या नंबर कोणाकडे असेल, तो ओळखीचाच असेल का? याचा विचार करावा. अनोळखी व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे स्टेटस, फोटो ठेवताना ते सेंटिंगमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट लिस्टमध्येच व्हिजिबल ठेवावेत.

कंगनाला विनाकारण बोलायची संधी दिली, प्रसिद्धी दिली; शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले

Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार

भारतीयांसाठी उद्या मोठा दिवस; शक्तीशाली योद्धा देशसेवेसाठी झेपावणार

Web Title: How to save from the harassment on WhatsApp? Learn tips and stay safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.