जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 01:26 PM2020-09-03T13:26:13+5:302020-09-03T13:32:47+5:30

व्हॉट्सअ‍ॅपने देखील आपल्या युजर्सना कमाल सुविधा दिली आहे. काही जबरदस्त सेटिंग्सच्या मदतीने हे करणं सहज शक्य आहे.

4 whatsapp privacy settings to keep your chats safe | जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग

जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग

googlenewsNext

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर हा केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग सुरक्षित राहावं, आपल्या व्यतिरिक्त ते इतर कोणी वाचू नये असे अनेकांना वाटत असतं. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने देखील आपल्या युजर्सना कमाल सुविधा दिली आहे. काही जबरदस्त सेटिंग्सच्या मदतीने हे करणं सहज शक्य आहे. चॅट कोणीच वाचू नये असं वाटत असेल तर नेमकं काय करायचं हे जाणून घेऊया. 

टू-स्टेप ऑथेंटिकेशन

टू-स्टेप ऑथेंटिकेशन व्हॉट्सअ‍ॅपवर सिक्योरिटीची एक्स्ट्रा लेयर देतं. यासाठी युजरला एक पिन सेट करावा लागेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये अकाऊंटमध्ये जाऊन Two-Step verification वर टॅप करावे लागेल. या ठिकाणी Enable वर क्लिक करून Pin सेट करा.

Read Receipts बंद करा

Read Receipts मुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचला आहे की नाही, हे समजत नाही. म्हणजेच मेसेज वाचल्यानंतरही ब्लू टिक होत नाही. तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन अकाऊंटमध्ये जा. या ठिकाणी Privacy च्या आत Read Reciepts चा पर्याय दिसेल. तो टर्न ऑफ करा.

फिंगरप्रिंट लॉकचा करा वापर 

व्हॉट्सअ‍ॅपसाठी फिंगरप्रिंट लॉकचा वापर करता येतो. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्समध्ये जाऊन Privacy ऑप्शनमध्ये जावे लागेल. या ठिकाणी खाली दिलेल्या Fingerprint Lock चा ऑप्शन दिसेल. याला इनेबल करा यानंतर कोणीही तुमचं व्हॉट्सअ‍ॅप ओपन करू शकणार नाही.

चॅट बॅकअप करा बंद

चॅट डिलीट केल्यानंतर ते परत मिळवण्याचा फायदा चॅट बॅकअपमुळे होतो. मात्र ते गुगल आणि अ‍ॅपल अकाउंट्सवर सेव्ह होतात. त्यामुळे ते हॅक होण्याचा धोका असतो. त्यामुळे चॅट ऑटो बॅक अप बंद करा. यासाठी सेटिंगमध्ये जा. त्यानंतर चॅट्स ऑप्शन निवडा. या ठिकाणी Chat Backup वर क्लिक करा आणि Backup to Google Drive मध्ये जाऊन Never सिलेक्ट करा.

महत्त्वाच्या बातम्या

भारीच! App ओपन न करता WhatsApp वर करता येतो झटपट मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?

"नोटबंदीचा श्रीमंत उद्योगपतींना झाला फायदा, गरीब-मजुरांवर सर्वात मोठा हल्ला"

बापरे! तरुणीच्या पोटात होता तब्बल 7 किलो केसांचा गोळा, डॉक्टरही झाले हैराण

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 83,883 नवे रुग्ण, 38 लाखांचा टप्पा केला पार

"सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप भाजपाला महागात पडेल"

"केंद्र सरकार 'हा' निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही", ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

Web Title: 4 whatsapp privacy settings to keep your chats safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.