भारीच! App ओपन न करता WhatsApp वर करता येतो झटपट मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 03:47 PM2020-09-01T15:47:16+5:302020-09-01T15:57:41+5:30

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं.

how to add whatsapp chat shortcuts on your home screen | भारीच! App ओपन न करता WhatsApp वर करता येतो झटपट मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?

भारीच! App ओपन न करता WhatsApp वर करता येतो झटपट मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?

Next

नवी दिल्ली - लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. एखादा फोटो, व्हिडीओ किंवा अन्य काही महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. मात्र व्हॉट्सअ‍ॅपमधील काही भन्नाट फीचरबद्दल अनेकांना माहिती नसते. 

App ओपन न करता व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या व्यक्तीला झटपट मेसेज करता येतो. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असलेल्या चॅट शॉर्टकट फीचरच्या मदतीने हे करणं सहज शक्य आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीला पटकन रिप्लाय देता येतो. चॅट शॉर्टकट फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅप युजर्स होम स्क्रीनवर कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा स्क्रिनशॉट अ‍ॅड करू शकतात. ज्या युजर्ससोबत तुम्ही सर्वाधिक चॅट करतो त्या चॅटचा शॉर्टकट हा क्रिएट करता येतो. 

होम स्क्रिनवर अ‍ॅड केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करता डायरेक्ट मेसेज पाहता येतात. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक लोकांचे मेसेज हे सातत्याने येत असतात. मात्र यामध्ये फेव्हरेट युजर्सचं चॅट इन्संट चेक करण्यासाठी या फीचरचा वापर करता येतो. तसेच होम स्क्रिनवर असलेलं शॉर्टकट हवं तेव्हा रिमूव्ह देखील करता येतं. आयकॉनवर प्रेस केल्यानंतर रिमूव्हचा ऑप्शन दिसतो. त्यावर टॅप करून शॉर्टकट डिलीट करता येतो. 

व्हॉट्सअ‍ॅप चॅट शॉर्टकट आपल्या होम स्क्रिनवर असं करा अ‍ॅड

- सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. जे चॅट होम स्क्रिनवर अ‍ॅड करायचं आहे. त्या चॅटवर क्लिक करा.

- चॅटवर क्लिक केल्यानंतर वर उजव्या कोपऱ्यात देण्यात आलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. 

- More वर टॅप करून 'Add Shortcut' वर क्लिक करा. यानंतर सिलेक्ट केलेलं चॅट होम स्क्रिनवर दिसेल. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : दिल्ली, मुंबई नाही तर 'हे' शहर आहे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, चिंताजनक आकडेवारी

झोपाळू लोकांसाठी सुवर्णसंधी! ऑफिसमध्ये काम नाही तर झोपा काढा अन् 1 लाख कमवा

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! आणखी 100 ट्रेन धावण्याची शक्यता, लवकरच मिळू शकतो दिलासा?

"'मन की बात'च्या व्हिडीओवरील 'डिस्लाईक' मागे काँग्रेस"

बापरे! अचानक गेली वीज, तब्बल 20 तास ट्रेनमध्ये अडकले हजारो प्रवासी

Web Title: how to add whatsapp chat shortcuts on your home screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.