WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 03:28 PM2020-08-24T15:28:40+5:302020-08-24T15:42:57+5:30

हे खास फीचर सध्या केवळ अँड्रॉईड बीटा युजर्ससाठी आणले जात आहे.

whatsapp Latest Beta Update Offering Different Ringtone For Group Calling | WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की... 

WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की... 

Next
ठळक मुद्देकंपनीने सिंगल म्हणजे वन-टू-वन कॉलिंगमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि तो पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी चॅटिंगचा आणखी चांगला अनुभव देण्यासाठी नवीन फीचर आणत आहे. यासाठी आता कंपनी ग्रुप कॉलिंगमध्ये खास बदल करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, ग्रुप कॉल आला की व्हॉट्सअॅपवर आता युजर्सला वेगळी रिंगटोन ऐकायला मिळेल. कंपनी हे बीटा अपडेट व्हर्जन क्रमांक 2.20.198.11 सोबत देत आहे. हे खास फीचर सध्या केवळ अँड्रॉईड बीटा युजर्ससाठी आणले जात आहे.

वन-टू-वन कॉलिंगच्या रिंगटोनमध्ये काही बदल नाही
या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, ज्यावेळी ग्रुप कॉल येईल त्यावेळी युजर्सला एक वेगळी रिंगटोन ऐकू येईल. याशिवाय, कंपनीने सिंगल म्हणजे वन-टू-वन कॉलिंगमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि तो पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. या अपडेटसह, फोनची रिंगटोन ऐकून येणारा कॉल हा एक ग्रुप कॉल आहे की वन-टू-वन कॉल आहे, हे युजर्सला समजून यावे, यासाठी हा कंपनीचा प्रयत्न आहे.

कॉलिंग स्क्रीनसाठी नवे इंटरफेस
काही रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅप आता कॉलिंग स्क्रीनसाठी नवीन यूजर इंटरफेसही आणत आहे. शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, आता कॉलिंग दरम्यान दिसणारी सर्व आयकॉन (चिन्हे) स्क्रीनच्या खाली येतील. यामध्ये, डिस्कनेक्टिंग करण्याचे आयकॉन सेंटरला (मध्यभागी) असेल.  तसेच, स्क्रीनवर दिसणारे उर्वरित ऑयकॉन जसे की कॅमेरा स्विच, मेसेज, कॅमेरा माइक इनेबल / डिसेबल खाली लाइनमध्ये दिसतील.

बगमुळे स्क्रीनमध्ये बदल दिसून येतात
युजर्सच्या इंटरफेसमध्ये झालेला हा बदल सध्या दिसू शकत नाही कारण तो सध्या डेव्हलमेंटच्या टप्प्यात आहे. तसेच, अपडेट कधीकधी बगमुळे दिसून येतात, असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. व्हॉट्सअॅपने नुकतेच नवीन अ‍ॅनिमेशन स्टिकर्स फीचरसुद्धा लाँच केले आहे. येणार्‍या अपडेट्सद्वारे युजर्संना हे फीचर मिळेल. मात्र, हे फीचर कंपनी अपडेट व्हर्जन 2.20.198.11 सोबत उपलब्ध करून देऊल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

आणखी बातम्या...
- "राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    
- महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा    
- बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    
- गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    
- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    
- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!!    

Web Title: whatsapp Latest Beta Update Offering Different Ringtone For Group Calling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.