Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 02:30 PM2020-09-09T14:30:10+5:302020-09-09T14:33:04+5:30

जिओ कमी किंमतीचे हँडसेट डेटा पॅकसह विकणार आहे. नजीकच्या काळात रिलायन्सने याबाबतची हिंट दिली होती. कंपनी लवकरच कमी किंमतीचे अँड्रॉईड फोन विकणार आहे, असे म्हटले होते. 

Reliance Jio will hit china; Will sell 1 crore cheap smartphones of 5G | Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार

Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार

Next

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची टेलिकॉम कंपनी Reliance Jio भारतात कमी किंमतीचे फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार Reliance Jio डिसेंबरपर्यंत अँड्रॉईड प्लॅटफॉर्मचे हँडसेट भारतीय बाजारात आणणार आहे. 


बिझनेस स्टँडर्डने याचे वृत्त दिले आहे. जिओ कमी किंमतीचे हँडसेट डेटा पॅकसह विकणार आहे. नजीकच्या काळात रिलायन्सने याबाबतची हिंट दिली होती. कंपनी लवकरच कमी किंमतीचे अँड्रॉईड फोन विकणार आहे, असे म्हटले होते. 


रिलायन्स इंडस्ट्रीने गुगलसोबत करार केली आहे. जुलैमध्ये कंपनीने सांगितले होते की, गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट रिलायन्सच्या डिजिटल युनिटमध्ये 4.5 अब्ज डॉलर गुंतविणार आहे. यावेळी रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितले होते की, गुगल कमी किंमतीचे 4G/5G स्मार्टफोनसाठी अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम तयार करत आहे. रिलायन्स डिझाईन करणार आहे. 


रिपोर्टनुसार रिलायन्स जिओ गुगलच्या नव्या प्लॅटफॉर्मवर असलेले 1 कोटी कमी किंमतीचे स्मार्टफोन बाहेरून बनवून घेऊ शकते. बिझनेस स्टँडर्डला सुत्रांनी ही माहिती दिली आहे. हे कमी किंमतीचे स्मार्टफोन एकतर डिसेंबरमध्ये लाँच होतील किंवा 2021 च्या सुरुवातीला लाँच केले जातील. 
भारतातील बाजारावर सध्या चिनी कंपन्यांचा पगडा आहे. यामध्ये शाओमी, व्हिवो, ओप्पो, वन प्लस आणि रिअलमी या कंपन्या आहेत. जिओच्या या पावलामुळे चिनी कंपन्यांना तगडी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. 

जिओचे प्लॅन्स
रिलायन्स जिओचा सर्वाधिक परवडणारा प्लॅन 199 रुपयांचा आहे. यामध्ये रोज 1.5 जीबी डेटा मिळतो. याची वैधता 28 दिवसांची आहे. याशिवाय एक्स्ट्रा 99 रुपये दिल्यावर Jio Prime मेंबरशिप मिळते. डेटासह जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर 1000 मिनिट दिले जात आहेत. तसेच 100 एसएमएस पाठविता येणार आहेत. 

दुसरा प्लॅन 249 रुपयांचा असून त्यामध्ये रोज 2 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. अन्य सुविधा 199 प्लॅन सारख्याच आहेत. तिसरा प्लॅन 349 रुपयांचा आहे. रोज 3 जीबी डेटा दिला जातो. यामध्ये मोफत कॉलिंग, एसएमएस सारखे फायदे आहेत. नव्या ऑफरनुसार 5 महिने मोफत डेटा, अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. 

Web Title: Reliance Jio will hit china; Will sell 1 crore cheap smartphones of 5G

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.