शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपल युजर्ससाठी केंद्राकडून हाय अलर्ट; सावधान, कधीही हॅक होऊ शकतो तुमचा आयफोन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:30 IST

अ‍ॅपलची उत्पादने बहुतांश श्रीमंत लोक, महत्वाची लोक वापरत असतात. सर्वात सुरक्षित म्हणून या कंपनीच्या उत्पादनांची ख्याती आहे.

आयफोन, आयपॅड, मॅकबुकसारखी महागडी डिव्हाईसेस वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या संस्थेने तुमची अ‍ॅपल डिव्हाईस हॅक होऊ शकतात, असा इशारा दिला आहे. अ‍ॅपलच्या डिव्हाईसेसमध्ये अनेक कमतरता असून त्याद्वारे हॅकर्स तुम्हाला लक्ष्य करू शकतात असे म्हटले गेले आहे. 

अ‍ॅपलची उत्पादने बहुतांश श्रीमंत लोक, महत्वाची लोक वापरत असतात. सर्वात सुरक्षित म्हणून या कंपनीच्या उत्पादनांची ख्याती आहे. परंतू, गेल्या काही काळात अ‍ॅपलची डिव्हाईस हॅक केल्याची प्रकरणे राजकारणी, उद्योजकांसोबत घडली आहेत. संसदेतही याची वाच्यचा झाली आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था CERT-In (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) ने हा इशारा दिला आहे. 

अ‍ॅपल डिव्हाईसमध्ये अनेक सुरक्षा त्रुटी आहेत. हॅकर्सनी याचा वापर केला तर ते तुमच्या डिव्हाइसवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात किंवा तुमचा डेटा चोरी करू शकतात. सिस्टम पूर्णपणे क्रॅश करू शकतात, असा इशारा सीईआरटी ईनने दिला आहे. आयफोन, आयपॅड, मॅकबुक, अ‍ॅपल टीव्ही अशा उपकरणांचा यात समावेश आहे. 

सुरक्षा यंत्रणा बायपास करण्यासारख्या त्रुटी यात आहेत. स्पूफिंग किंवा सेवा नाकारणे (DoS) हल्ले करू शकतात. सिस्टिममधील तुमचे अधिकार वापरू शकतात, असे CIVN-2025-0071 या गाईडलाईन्समध्ये म्हटले आहे. हा धोक्याच्या इशारा उच्च पातळीच्या श्रेणीत ठेवण्यात आला असून जर तुमच्याकडील डिव्हाईसेस वेळेत अपडेट केली नाहीत तर ती हॅकर्सच्या नियंत्रणात जाण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. तुमचा डेटा बदलू शकतात. यामुळे सीईआरटीने सावध राहण्यास सांगितले आहे. 

टॅग्स :Apple Incअॅपल