Google : गुगलवर 'या' गोष्टी सर्च करताय? मग, व्हा सावध, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 09:52 PM2022-09-29T21:52:52+5:302022-09-29T21:53:15+5:30

Google : गुगलच्या मदतीने संवेदनशील गोष्टींबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा संबंधित व्यक्तींना जेलची हवा खावी लागली आहे.

google search can be dangerous for users if not used responsibly | Google : गुगलवर 'या' गोष्टी सर्च करताय? मग, व्हा सावध, अन्यथा...

Google : गुगलवर 'या' गोष्टी सर्च करताय? मग, व्हा सावध, अन्यथा...

googlenewsNext

नवी दिल्ली : इंटरनेट हा आज आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. याद्वारे गुगलवर (Google) अनेकदा आपण रिकाम्या वेळेत, जे सुचेल ते शोधण्याचा, त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. गुगलमुळे आपल्या माहितीत (Information) भर पडते. तसेच,  ज्ञान (knowledge) वाढते. मात्र काही अशा गोष्टी आहेत, ज्या गुगलवर सर्च करणे धोकादायक (dangerous) आणि अडचणीचे ठरु शकते. 

आतापर्यंत काहींनी गुगलच्या मदतीने संवेदनशील गोष्टींबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा संबंधित व्यक्तींना जेलची हवा खावी लागली आहे. तसेच, अशा लोकांवर न्यायालयात खटला देखील चालवला जातो. गुगलवर असे नक्की काय सर्च करायचं नाही. तसेच काय सर्च केल्याने अडचणी वाढू शकतात. जर तुम्हाला अशा विषयाची माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत.

शस्त्रे बनविण्याची प्रक्रिया
अनेक जण गंमतीने गुगलवर अनेक वेळा शस्त्रे बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल सर्च करतात, पण तुम्हाला माहिती आहे का? असे केल्याने अडचणी वाढू शकतात. कोणत्याही दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या अशा शोधांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा नेहमीच लक्ष ठेवून असते अशा परिस्थितीत जर तुम्ही शस्त्रे बनवण्याच्या प्रक्रियेचा शोध घेतला तर तुम्ही तुरुंगात पोहोचू शकता.

दंगलीचे व्हीडिओ
माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने गुगलवर दंगलीचे व्हिडीओ शोधत असाल, तर तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, मात्र असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कारण, अनेकदा गुन्हेगार असे व्हीडिओ पाहून प्रेरणा घेतात आणि नंतर गुन्हे करतात. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत सरकार अशा विषयांवर शोध घेणाऱ्यांवर कडक कारवाई करते.

Web Title: google search can be dangerous for users if not used responsibly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.