google chrome users need to update newversion of OS to avoid bug SSS | Google Chrome चा वापर करता?, मग त्वरित करा 'हे' काम, अन्यथा...

Google Chrome चा वापर करता?, मग त्वरित करा 'हे' काम, अन्यथा...

नवी दिल्ली - हॅकिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हॅकर्स अत्यंत शिताफीने युजर्सचा डेटा चोरत आहेत. यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुगल क्रोमचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र गुगल क्रोमचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं अशी माहिती आता समोर आली आहे. गुगल क्रोमने नवं स्टेबल व्हर्जन 80.0.3987.122 आहे. जे विंडोज (windows), मॅकOS (MacOS) आणि Linux युजर्ससाठी ते उपलब्ध करण्यात आलं आहे. 

हॅकिंगपासून वाचण्यासाठी गुगलनेच एक नवा सल्ला दिला आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर गुगल क्रोमचा वापर केला जातो. त्यामुळे गुगलने आता सर्व क्रोम युजर्सना आपलं ब्राऊजर अपडेट करायला सांगितलं आहे. क्रोम ब्राऊजर अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम Chrome Web browser वर जा. त्यानंतर About Chrome वर जाऊन update to download आणि install  Allow करा. वेबचा वापर करताना अनेकदा युजर्स क्रोमचा वापर करतात. विविध बगमुळे सावध राहणं गरजेचं आहे. 

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, क्रोमसाठी एक फिक्स रोलआऊट केलं आहे. ज्याच्या मदतीने युजर्स हॅकिंगपासून वाचू शकतात. ब्राऊजर अपडेट न केल्यास हॅकर्स युजर्सचं डिव्हाईस हॅक करू शकतात. गुगल क्रोमच्या या अपडेटच्या माध्यमातून जीरो डे वल्नरबिलिटी ठिक केली असल्याची माहिती डिजिटल ट्रेंड्सने दिली आहे. जुने व्हर्जन असलेल्या क्रोम बाऊजरवर हॅकिंगचं सावट आहे. 

हॅकर्स सहजतेने ब्राऊजर मेमरीमध्ये स्टोर असलेला डेटा करप्ट अथवा मॉडिफाय करत आहेत. यापासून वाचण्यासाठी फिक्स रोलआऊट करण्यात आले आहे. क्रोमचा विचार केल्यास कंपनीने आयओएस, मॅक, विंडोज आणि लिनक्सचं ब्राऊजर क्रोम 78 अपडेट केलं आहे. आयफोन युजर्सना या अपडेटसह सिस्टम वाईड डार्क मोड मिळाला आहे. डिस्प्ले आणि ब्राईटनेस सेटिंगमध्ये जाऊन डार्क मोड सिलेक्ट केल्यास गुगल क्रोम ते वेगळं ऑफ करण्याचा ऑप्शन देणार नाही. 

'या' बातम्या ही नक्की वाचा

Xiaomi च्या मोबाईलवर मिळणार ISRO चे तंत्रज्ञान; गुगलला मोठा धक्का

TikTok ने आणलं दमदार फीचर, मुलांच्या करामतींवर आता पालकांची नजर

'Meena' मारणार युजर्सशी मनसोक्त गप्पा, गुगलने आणली भन्नाट 'चॅटबोट'

देशातील पहिला 5 जी स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला लाँच होणार, जाणून घ्या किंमत

आता स्मार्टफोन राहणार थंडा थंडा कूल कूल, शाओमीचा नवा पंखा पॉवरफूल

 

English summary :
serious warning for google chrome users need to update newversion of operating system to avoid bug

Web Title: google chrome users need to update newversion of OS to avoid bug SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.