ndia’s first 5G smartphone to be launched on February 24 | देशातील पहिला 5 जी स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला लाँच होणार, जाणून घ्या किंमत

देशातील पहिला 5 जी स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला लाँच होणार, जाणून घ्या किंमत

ठळक मुद्देस्मार्टफोनची किंमत जवळपास 50 हजार रुपये असण्याची शक्यताकोरोना व्हायरसची धास्ती, जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट रद्द!'या स्मार्टफोनची टेकनिक जगभरातील जवळपास प्रत्येक विकसित देशात उपलब्ध आहे'

नवी दिल्ली : भारतातील पहिला 5 जी स्मार्टफोन येत्या 24 फेब्रुवारीला लाँच होणार आहे. स्मार्टफोन तयार करणारी चीनमधील 'Realme' या कंपनीने या 5 जी स्मार्टफोनच्या लाँचिंगची पूर्ण तयारी केली आहे. कंपनीच्या अधिकृत सुत्रांच्या माहितीनुसार, या स्मार्टफोनची किंमत जवळपास 50 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, "मोबाईलच्या क्षेत्रात 2018 मध्ये पाऊल टाकणारी कंपनी येत्या 24 फेब्रुवारीला भारतात पहिला 5 जी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, सध्या देशात 5 जीचे नेटवर्क नाही आहे." 'Realme'चा हा स्मार्टफोन 865 स्नॅपड्रॅगन चिपसेटसोबत मार्केटमध्ये येणार आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत जवळपास 50 हजार रुपये असणार आहे, असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Image result for 5g smartphone

मोबाईल फोन्सची तुलना करणारी एक वेबसाइटचा अंदाज आहे की, कमी चिपसेट आवृत्तीसोबत 5 जी स्मार्टफोनची किंमत 25,790 रुपये प्रति युनिटवर उपलब्ध होऊ शकते. कंपनी भविष्यातील दृष्टीकोण पाहून उत्पादन करू इच्छिते. ज्यामुळे जगाभरातील लोक याचा वापर करू शकतील. या स्मार्टफोनची टेकनिक जगभरातील जवळपास प्रत्येक विकसित देशात उपलब्ध आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले. 

'Realme'द्वारे एक्स 50 प्रो 5 जी स्मार्टफोन भारत आणि स्पेनमध्ये लाँच करण्यात येईल. याचबरोबर, चीनमधील एक नवीन स्मार्टफोन ब्रांड iQOO 3 सुद्धा 25 फेब्रुवारीला आपल्या 5 जी स्मार्टफोनची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

Mobile World Congress canceled due to coronavirus | कोरोना व्हायरसची धास्ती, जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट रद्द!

कोरोना व्हायरसची धास्ती, जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट रद्द!
चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या कोरोना व्हायरसचा फटका टेक इंटस्ट्रीला सुद्धा बसला आहे. याबाबतचा धोका लक्षात घेऊन 'जीएसएमए'ने(GSMA) जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2020 (Mobile World Congress 2020) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसएमए कंपनीकडून गेल्या कित्येक वर्षांपासून या इव्हेंटचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, नोकिया, फेसबुक, विवो, सोनी आणिअॅमेझॉन यासारख्या कंपन्यांनी आधीची या इव्हेंटमधून बॅकआऊट केले आहे. कोरोना व्हायरसची भीषणता लक्षात घेऊन आमच्या कर्मचारी आणि पार्टनर्सच्या सुरक्षतेच्या दृष्टीने या इव्हेंटमध्ये भाग घेतला नसल्याचे या कंपन्यांनी सांगितले आहे. 
 

Web Title: ndia’s first 5G smartphone to be launched on February 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.