TikTok ने आणलं दमदार फीचर, मुलांच्या करामतींवर आता पालकांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 01:44 PM2020-02-20T13:44:10+5:302020-02-20T13:48:30+5:30

शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकने एक नवं फीचर इंट्रोड्यूस केलं आहे.

now parents get control on childrens tiktok feed app launched new family safety feature | TikTok ने आणलं दमदार फीचर, मुलांच्या करामतींवर आता पालकांची नजर

TikTok ने आणलं दमदार फीचर, मुलांच्या करामतींवर आता पालकांची नजर

Next

नवी दिल्ली - TikTok हे लोकप्रिय अ‍ॅप असून तरुणाईमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकने एक नवं फीचर इंट्रोड्यूस केलं आहे. या फीचरच्या मदतीने पालक आपल्या मुलांच्या टिकटॉक व्हिडीओवर कंट्रोल ठेवू शकणार आहेत. सेफ्टी मोड असं या नवं फीचरचं नाव असून मुलाच्या टिकटॉक व्हिडीओवर पालकांची नजर असणार आहे. टिकटॉकवर कोणता व्हिडीओ दिसला पाहिजे हे पालक ठरवणार आहेत. या फीचरमध्ये मुलांचं अकाऊंट हे पालकांच्या अकाऊंटसोबत लिंक करण्यात येणार आहे. 

ब्लॉग पोस्टमध्ये या टिकटॉकच्या या नव्या फीचरची माहिती देण्याच आली आहे. जेव्हा लोक टिकटॉकचा वापर करतात. तेव्हा त्यांचा अनुभव हा मजेशीर, स्पष्ट आणि सुरक्षित असतो. आम्ही युजर्संना या प्लॅटफॉर्मवर चांगला व सुरक्षित अनुभव देऊ इच्छित आहोत. त्यासाठी हे नवं फीचर आणणार आहोत. फॅमिली सेफ्टी मोडची घोषणा करण्यात आली आहे. या फीचरच्या मदतीने पालक अल्पवयीन मुला-मुलीच्या टिकटॉकवर कंट्रोल करू शकणार आहे. त्यांच्यावर नजर ठेवू शकणार आहे. 

भारतात अल्पावधीत टिकटॉक खूप लोकप्रिय झाले असून मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. भारतीय युजर्सने टिकटॉकवर 2018 सालच्या तुलनेत 2019 मध्ये सहापट अधिक वेळ घालवला आहे. 2019 मध्ये भारतीयांनी 5.5 अब्ज तास टिकटॉकवर घालवले आहेत. मोबाईल आणि अ‍ॅनालिटिक्स फर्म App Annie च्या माहितीनुसार, अँड्रॉईड युजर्सने 2018 मध्ये एकूण 900 मिलियन (9 कोटी) तास टिकटॉकवर घालवले आहेत. 

टिकटॉकवर (TikTok) अनेक आव्हानात्मक (चॅलेंज) व्हिडीओ व्हायरल (TikTok Viral Video) होत आहेत. अशा व्हिडीओंचा ट्रेंड सोशल मीडियावर जास्त पाहायला मिळतो. मात्र, एका चॅलेंज व्हिडीओमुळे मुलांच्या आई-वडिलांची झोप उडाली आहे. या व्हिडिओला सर्वात धोकादायक चॅलेंज म्हटले जात आहे. या चॅलेंजचे नाव आहे, स्कल ब्रेकर चॅलेंज(Skull breaker challenge). टिकटॉकवर अशा चॅलेंजचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे चॅलेंज सर्वात आधी परदेशात सुरू झाले, आता भारतातील युजर्स सुद्धा करत आहेत. 

Youth

काय आहे, स्कल ब्रेकर चॅलेंज?

हा चॅलेंज व्हिडिओ करण्यासाठी तीन जणांची आवश्यकता असते. सुरुवातीला पहिला व्यक्ती हवेत उडी मारतो. त्यानंतर तिसरा व्यक्ती सुद्धा असेच करतो. ज्यावेळी दुसरा व्यक्ती उडी मारतो. त्यावेळी पहिला आणि तिसरा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पाय मारून पाडतो. दोन्ही पाय हवेत असल्यामुळे दुसरा व्यक्ती थेट डोक्यावर पडतो. त्यामुळे याचे नाव स्कल ब्रेकर चॅलेंज ठेवण्यात आले आहे. डोक्यावर पडल्यामुळे अनेकजण बेशुद्ध झाले आहेत, तर काही जणांची डोक्यावर पडल्यामुळे मानेची हाडे तुटली आहेत. 

'या' बातम्या ही नक्की वाचा

'Meena' मारणार युजर्सशी मनसोक्त गप्पा, गुगलने आणली भन्नाट 'चॅटबोट'

देशातील पहिला 5 जी स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला लाँच होणार, जाणून घ्या किंमत

रेल्वे स्थानकांवरील 'फुकट' वायफाय झाले बंद; गुगलने का घेतला निर्णय?

आता स्मार्टफोन राहणार थंडा थंडा कूल कूल, शाओमीचा नवा पंखा पॉवरफूल

आता Google वरून करा फोनचा रिचार्ज ; कसं ते जाणून घ्या

अवघ्या 10 सेकंदात अनलॉक करा स्मार्टफोन, फॉलो करा सोप्या स्टेप्स...

महत्त्वाच्या बातम्या 

Devendra Fadnavis: या सगळ्यामागे कोण आहे ते माहीत्येय; फडणवीसांनी सांगितली नेमकी 'केस'

Breaking: स्वतः कोर्टात हजर झालेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलासा; जामीन मंजूर

राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवली, मग मशिदीसाठी का नाही? शरद पवार यांचा सवाल 

तामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू 

जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

 

Web Title: now parents get control on childrens tiktok feed app launched new family safety feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.