19 people dead in a collision between bus & a truck in Tamil Nadu | तामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू 

तामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू 

ठळक मुद्देतामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहराजवळ एका बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. 19 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

चेन्नई - तामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे. मृतांमध्ये 14 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (20 फेब्रुवारी) तामिळनाडूमध्ये भीषण अपघात झाला. तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहराजवळ एका बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 14 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटकातील बंगळुरूमधून केरळच्या दिशेने ही बस जात असताना हा अपघात झाला. तिरपूरच्या सरकारी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या 

जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

कमल हासनच्या इंडियन 2च्या सेटवर भीषण अपघात, तीन ठार

राम मंदिर उभारणीला १५ दिवसांत येणार वेग, २0२४ पर्यंत मंदिर पूर्ण?

भिवंडी आग : ‘मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम’ला उत्पादन बंद करण्याचे आदेश

 

English summary :
16 people feared dead in a collision between a Kerala State Road Transport Corporation bus & a truck near Avinashi town of Tirupur dist. The bus was going from Karnataka's Bengaluru to Kerala's Ernakulam.

Web Title: 19 people dead in a collision between bus & a truck in Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.