शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

फेस अनलॉक फीचर्सयुक्त लाव्हा झेड ९१

By शेखर पाटील | Published: March 30, 2018 11:03 AM

लाव्हा मोबाईल्स कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी लाव्हा झेड ९१ हे मॉडेल लाँच केले असून यात फेस अनलॉक हे फीचर देण्यात आले आहे.

कधी काळी फक्त उच्च श्रेणीतील स्मार्टफोनमध्ये असणारे फेस अनलॉक हे फिचर आता किफायतशीर दरातील मॉडेल्समध्येही मिळू लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर, लाव्हा झेड ९१ या स्मार्टफोनमध्येही हे फीचर प्रदान करण्यात आले आहे. याचे मूल्य ९,९९९ रूपये असून यासोबत एयरटेल कंपनीने २ हजार रूपयांपर्यंतचा कॅशबॅक देण्याचे जाहीर केले आहे.

लाव्हा झेड ९१ या मॉडेलमध्ये एलईडी फ्लॅश आणि एफ/२.० अपार्चरसह १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यात बोके इफेक्ट देण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एफ/२.२ अपार्चरयुक्त ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट ७.१ या आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या स्टार ओएस ४.२ वर चालणारा आहे. 

लाव्हा झेड ९१ या स्मार्टफोनमधील दुसरे वैशिष्ट्यपूर्ण फिचर म्हणजे १८:९ गुणोत्तर असणारा आणि फुल  व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले होय. हा डिस्प्ले ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजेच १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा असून यावर २.५ डी वक्राकार ग्लास प्रदान करण्यात आला आहे. यात मीडियाटेक एमटी ६७३९ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. तर यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान