याला म्हणतात बंपर ऑफर! Vivo V21 5G फक्त ६५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन जा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 02:54 PM2021-05-09T14:54:24+5:302021-05-09T14:55:09+5:30

Vivo च्या स्मार्टफोनवर ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर असून, ३० हजार रुपयांचा स्मार्टफोन केवळ ६ हजार ५०० रुपयांना खरेदी करता येऊ शकेल.

bumper offer get 30 thousand vivo v21 5g for less than 6500 rupees see details | याला म्हणतात बंपर ऑफर! Vivo V21 5G फक्त ६५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन जा...

याला म्हणतात बंपर ऑफर! Vivo V21 5G फक्त ६५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन जा...

Next

नवी दिल्ली: भारतात विविध कंपन्यांचे स्मार्टफोन्स लॉंच होत आहे. स्मार्टफोन्समोबाइल क्षेत्रात भारत मोठी बाजारपेठ असल्याने अनेकविध प्रकारचे आणि कमी किमतीत जास्त सुविधा देणारे स्मार्टफोन्स लॉंच केले जात आहेत. Vivo च्या स्मार्टफोनवर ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर असून, ३० हजार रुपयांचा स्मार्टफोन केवळ ६ हजार ५०० रुपयांना खरेदी करता येऊ शकेल. (bumper offer get 30 thousand vivo v21 5g for less than 6500 rupees see details)

Vivo कंपनीने अलीकडेच भारतात Vivo V21 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये दमदार कॅमेरा, अद्ययावत प्रोसेसर अशी अनेक वैशिष्ट्ये आढळून येतात. या स्मार्टफोनची किंमत २९ हजार ९९० रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टवरील भन्नाट ऑफर अंतर्गत हा स्मार्टफोन केवळ ६ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. कसे? जाणून घ्या...

Qualcomm च्या चिपसेटमध्ये मोठी गडबड; हॅकर कोणाचेही कॉल ऐकू शकतात!

Vivo V21 5G वर खास ऑफर

Vivo V21 5G या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टने बंपर ऑफर आणली आहे. १९ हजार रुपयांच्या सूटसह अडीच हजारांचा एक्सचेंज बोनस ऑफर केला जात आहे. म्हणजेच मूळ किमतीवर तब्बल २१ हजार ५०० रुपयांचा लाभ ग्राहक मिळवू शकतात, असे सांगितले जात आहे. तसेच HDFC Bank Credit Card वरून हा स्मार्टफोन खरेदी केल्यास २ हजार रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट ऑफर केला जात आहे. याशिवास Flipkart Axis Bank Credit Card वरून स्मार्टफोन खरेदी केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक तसेच Bank of Baroda Mastercard debit card first time transaction वर १० टक्के सूट देण्यात येत आहे. 

किमतीत आयफोनलाही टाकले मागे; Sony च्या 'या' फोनसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये

केवळ ६ हजार ४०० रुपयांत स्मार्टफोनची खरेदी

एखाद्या ग्राहकाने एक्सचेंज बोनसचा लाभ घेत HDFC Bank Credit Card वरून हा स्मार्टफोन खरेदी केला, तर एकूण २१,५०० रुपये (एक्सचेंज बोनस)+२ हजार (HDFC कार्डावर इंस्टंट डिस्काउंट) = २३,५०० रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. Vivo V21 5G या स्मार्टफोनच्या ८+१२८GB व्हेरिअंटची किंमत २९ हजार ९९० रुपये आहे. सदर सर्व ऑफरचा लाभ घेतला, तर हा फोन केवळ ६ हजार ४०० रुपयांना खरेदी करता येणे शक्य होणार आहे.   

 

Web Title: bumper offer get 30 thousand vivo v21 5g for less than 6500 rupees see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app