शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपल आयफोन १७, अ‍ॅल्युमिनिअम बॉडीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली; लोकांनी भगवा म्हणून घेतला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:23 IST

Apple iPhone 17 Problems: सोशल मीडियावर लोकांनी आयफोनच्या रंगाबाबत आणि अ‍ॅल्युमिनिअम फ्रेमबाबत तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांचे आयफोन थोडे जरी घासले तरी वरचा रंग खरचटून जात आहे.

अ‍ॅपलच्या आयफोन १७ ने भारतात कमालीची क्रेझ निर्माण केली आहे. मुंबई, पुण्यात अ‍ॅपल स्टोअरला खरेदीदारांचा पूर आला होता. हा पूर ओसरत नाही तोच आता आयफोनच्या या नव्या अ‍ॅल्युमिनिअम फ्रेमने रंग दाखवायला सुरुवात केली आहे. यामुळे हे नवीन रंगाचे आयफोन घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील रंग बदलू लागले आहेत. 

सोशल मीडियावर लोकांनी आयफोनच्या रंगाबाबत आणि अ‍ॅल्युमिनिअम फ्रेमबाबत तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांचे आयफोन थोडे जरी घासले तरी वरचा रंग खरचटून जात आहे. यामुळे आतील अ‍ॅल्युमिनिअम दिसत आहे. यामुळे ज्यांना आयफोन १७ घ्यायचा असेल त्यांनी सिल्व्हर रंगाचाच आयफोन घ्यावा असे सल्ले दिले जाऊ लागले आहेत. 

तसेच अ‍ॅल्युमिनिअम हे वजनाने हलके आणि मऊ असते हे आता सर्वांनाचा माहिती आहे. कारण प्रत्येकाच्या घरात या धातूची भांडी आहेत. हा आयफोन १७ जरा जरी पडला तरी त्याची बॉडी, कॉर्नरना खोक पडत आहे. ती पुन्हा दुरुस्त होणारी नाही. तसेच अ‍ॅल्युमिनिअम हा धातू रंग धरून ठेवणारा नाही, यामुळे त्यावर वेगवेगळे रंग देता येत नाहीत, तरीही अ‍ॅपलने पुन्हा अ‍ॅल्युमिनिअम बॉडी आणल्याने त्यावरही ग्राहक टीका करू लागले आहेत. 

टॅग्स :Apple Incअॅपल