शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

iPhone 11: अ‍ॅपलकडून तीन नवे फोन लॉन्च; जाणून घ्या किती असणार किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 08:53 IST

आयफोनची 11 सीरिज लॉन्च; 27 सप्टेंबरपासून भारतात विक्री

कॅलिफॉर्निया: अ‍ॅपलनं आयफोन 11 सीरिज लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये तीन फोन्सचा समावेश आहे. iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max या महिन्याच्या अखेरीस भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील. आयफोन 11 सीरिजमधील फोन्सची किंमत 699 डॉलरपासून सुरु होणार आहे. या नव्या फोन्समध्ये A13 बायोनिक चिपसेट असेल. iPhone 11 ची भारतातील किंमत 64,900 रुपयांपासून सुरू होईल. यामध्ये 64 जीबी मेमरी असेल. याशिवाय हा फोन 128 जीबी आणि 256 जीबी वेरिएंटमध्येही उपलब्ध असेल. iPhone Pro भारतात 99,900 रुपयांपासून उपलब्ध होईल. तर iPhone 11 Pro Max ची किंमत 1,09,900 रुपयांपासून सुरू होईल. iPhone Pro आणि iPhone 11 Pro Max च्या या किमती 64 जीबी वेरिएंटच्या आहेत. याशिवाय हे दोन्ही फोन्स 256 जीबी आणि 512 जीबी मेमरी सुविधेसह उपलब्ध असतील. भारतात 27 सप्टेंबरपासून या फोन्सची विक्री सुरू होईल.  iPhone 11 पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. या फोनमध्ये 6.1 इंचाची LCD IPS HD स्क्रीन असेल. कंपनीनं या फोनमध्ये A13 बायोनिक प्रोसेसर दिला आहे. या फोनची बॅटरी iPhone XR च्या तुलनेत जास्त वेळ चालेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हा फोन पाण्याखाली 2 मीटरपर्यंत जवळपास अर्धा तास उत्तम स्थितीत राहू शकतो. iPhone 11 चा फ्रंट कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे. तर बॅक साईडला 12-12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Apple Incअॅपल