शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

एआय अपडेट: डिजिटल वसाहतवादाला उत्तर 'एआय फॉर पीपल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 14:00 IST

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेली 'ग्लोबल एआय समिट' ही चालू वर्षातील सर्वात महत्त्वाची जागतिक घडामोड ठरली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमन, सुरक्षितता आणि परिणामांच्या संदर्भात जागतिक पातळीवर ठोस चौकट उभी करण्याचा हा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे ही परिषद 'ग्लोबल साऊथ'मध्ये प्रथमच झाली आणि त्यामुळे तिचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर (संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य)
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे उद्याच्या जगाचे वास्तव. उद्योग, अर्थकारण, कृषी, आरोग्य, शिक्षण, संरक्षण, वाहतूक, दळणवळण, अवकाश संशोधन अशा सर्व क्षेत्रांत एआयमुळे आमूलाग्र बदल घडत आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचा प्रसार सध्या बेलगाम असा आहे. जागतिक पातळीवर कोणतेही बंधनकारक करार, कन्व्हेन्शन किंवा नियमनाची एकसंध चौकट नाही. इंग्लंड, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्ये झालेल्या पूर्वीच्या परिषदांत सुरक्षा आणि नियमनावर भर होता; परंतु ठोस अंमलबजावणी यंत्रणा आकारास आली नाही. या पार्श्वभूमीवर भारतातील 'एआय इम्पॅक्ट परिषद' परिणामकेंद्री दृष्टीकोन मांडणारी ठरली.

भारतामध्ये सुमारे २० देशांचे प्रमुख सहभागी झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यासह अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कॉर्पोरेट विश्वातील सुंदर पिचाई, सत्या नडेला, बिल गेट्स यांसारखे दिग्गजही सहभागी झाले. ही परिषद केवळ नियमनापुरती मर्यादित न राहता 'एआयचा लोकांवर आणि पृथ्वीवर होणारा परिणाम' या व्यापक विषयावर केंद्रित होती. त्यामुळे तिचा व्याप्तीगत विस्तार लक्षणीय ठरला.

भारताची एआय क्षमतांची झेप

स्टॅनफोर्डच्या ताज्या अहवालानुसार 'एआय व्हायब्रन्सी इंडेक्स'मध्ये अमेरिका प्रथम, चीन द्वितीय आणि भारत तृतीय क्रमांकावर आहे. अॅप्लिकेशन, मॉडेल, एनर्जी, चीप आणि इन्फ्रास्ट्रक्चर या पाचही स्तरांवर भारताने प्रगती साधली आहे. भारत आता एआय पेनिट्रेशनमध्ये 'टीअर-१' गटात सहभागी झाला आहे. १७५ अब्ज डॉलर खर्चुन विशाखापट्टणम येथे 'एआय सिटी' उभारण्याची योजना आहे. 'किसान मित्र' अॅप व 'भाषिणी'सारख्या उपक्रमांमुळे तंत्रज्ञानाचा लाभसर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या घडीला 'एआय'चे लोकशाहीकरण आवश्यक

जगात 'डिजिटल डिव्हायडेशन' प्रकर्षाने जाणवते. अमेरिका, युरोप आणि चीनकडे डेटासेट व कॉम्प्युटिंग संसाधनांची मक्तेदारी आहे. या पार्श्वभूमीवर 'एआय'चे लोकशाहीकरण आवश्यक आहे.

भारताने 'एआय फॉर पीपल, एआय फॉर प्लॅनेट, एआय फॉर प्रोग्रेस' ही उद्दिष्टे मांडली. स्थानिक भाषा, सर्वसमावेशकता, डेटाबेस आणि मूलभूत गरजांवर उपाययोजना यावर परिषदेत भर देण्यात आला.

परिषद ऐतिहासिक का?

पूर्वीच्या परिषदांत 'एआय'ची १ सुरक्षा आणि नियमनावर भर होता; मात्र दिल्लीतील परिषद परिणाम, सर्वसमावेशकता आणि विकासाभिमुख वापरावर केंद्रित होती.

५०० हून अधिक भाषणांमधून एआय साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न झाला. जनतेच्या मूलभूत गरजांसाठी एआय कसा उपयोगी ठरू शकतो, यावर ठोस विचारमंथन झाले. त्यामुळेच ही परिषद गुणात्मक दृष्ट्या ऐतिहासिक ठरते.

(लेखकाची मते व्यक्तिगत आहेत.)

English
हिंदी सारांश
Web Title : AI for People: An Answer to Digital Colonialism

Web Summary : India's AI Impact conference shifted focus to inclusivity, impact, and development. Prioritizing 'AI for People,' the conference emphasized using AI for basic needs and local languages, democratizing the technology beyond a select few nations.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सtechnologyतंत्रज्ञानResearchसंशोधनEducationशिक्षण