ज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 19:48 IST2018-08-09T19:47:54+5:302018-08-09T19:48:47+5:30

 ' त्या '  मुलीने आरोप केल्यामुळे त्याचे संघटनेने निलंबन केले आणि त्याला स्पर्धेला मुकावे लागले. पण आता  ' त्या ' मुलीबरोबर  भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न केल्याची बाब समोर आली आहे.

The girl who committed rape's accusation, did the same with the player of India's marriage | ज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न

ज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न

ठळक मुद्देया खेळाडूला आता ऑलिम्पिकचे वेध लागले आहेत. पण हे प्रकरण सुरु झाल्यापासून त्या खेळाडूला सराव करता आलेला नाही.

नवी दिल्ली : चार महिन्यांपूर्वी  ' तिने '  एका भारतीय खेळाडूवर बलात्काराचा आरोप केला होता. हा आरोप अशा वेळी करण्यात आला की त्यावेळी ' तो ' खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला जायच्या तयारीत होता. पण  ' त्या '  मुलीने आरोप केल्यामुळे त्याचे संघटनेने निलंबन केले आणि त्याला स्पर्धेला मुकावे लागले. पण आता  ' त्या ' मुलीबरोबर  भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न केल्याची बाब समोर आली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तयारी करत असताना त्याच्यावर  ' त्या ' खेळाडूने बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयात गेले. हे सर्व पाहिल्यावर क्रीडा संघटनेने त्या खेळाडूचे निलंबन केले. पण या खेळाडूला आता ऑलिम्पिकचे वेध लागले आहेत. पण हे प्रकरण सुरु झाल्यापासून त्या खेळाडूला सराव करता आलेला नाही. हे सारे पाहता ' या ' खेळाडूने बलात्काराचा आरोप करणाऱ्या मुलीशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बलात्काराचा आरोप करणाऱ्या मुलीश लग्न केल्यावर ती याचिका मागे घेईल. त्यानंतर क्रीडा संघटनाही खेळण्यास परवानगी देईल आणि ऑलिम्पिकच्या तयारीला सुरुवात करू शकू, असे या खेळाडूने विचार केला. आता तुम्ही विचार करत असाल हा भारताचा खेळाडू नेमका कोण, तर तो खेळाडू आहे भारता टेबल टेनिसपटू सौम्यजित घोष.

Web Title: The girl who committed rape's accusation, did the same with the player of India's marriage