शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या खूनप्रकरणी पत्नीला जन्मठेप

By admin | Updated: May 3, 2014 14:41 IST

घरातून निघून जा म्हणून त्रास देणार्‍या पतीचा पलंगाला बांधून लाकडाने मारहाण करून खून केल्याच्या आरोपावरून पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सोलापूर : घरातून निघून जा म्हणून त्रास देणार्‍या पतीचा पलंगाला बांधून लाकडाने मारहाण करून खून केल्याच्या आरोपावरून शहेनाज अमजद शेख (वय 40, रा. मड्डीवस्ती, कुमठे, उत्तर सोलापूर) हिला अतिरिक्त सत्र न्यायाधीश कल्पना होरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी शहेनाज हिचा पती अमजद (वय 45) हा कारखान्यात काम करीत होता पण घरखर्चाला घरी पैसे देत नसे. त्याला तीन मुले आहेत. त्यातील एक मुलगा भिवंडीत कामाला गेला होता तर दोन मुले सोबत राहत होती. कामावरून घरी येताना तो दारू पिऊन येत असे. घरी आल्यावर पत्नी व मुलांना मारहाण करून घरातून निघून जा अशी दमदाटी करीत असे. 5 जून 2011 रोजी सकाळी 11 वा. असे घडले. अहमजदच्या दररोजच्या त्रासाला वैतागलेल्या शहेनाज हिने मुलांच्या मदतीने त्याला पलंगाला बांधले व लाकडाने मारहाण केली. हे समजल्यावर दुपारी साडेचार वाजता युसूफ याने मावसभाऊ रहिमान शेख (रा. टिकेकरवाडी) याला बोलावून घेतले. तो आल्यावर त्याची मावशी, आरोपी शहेनाज व मुले घराबाहेर बसली होती. काय झाले असे विचारल्यावर तिने नवर्‍याला बांधून घातल्याचे सांगितले. मुलांनी कुलूप उघडल्यावर रहिमान आत गेला. त्याला अमजद जखमी अवस्थेत आढळला. रहिमानने त्याची सुटका केली. पुन्हा भांडण करू नका, अमजदला दवाखान्याला न्या असे बजावून तो घरी गेला. दुसर्‍या दिवशी सकाळी अमजद हा घरी मृतावस्थेत आढळला.विजापूर नाका पोलिसांनी शहेनाज व तिच्या दोन मुलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. खटल्याच्या सुनावणीवेळेस सरकारतर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले.त्यात फिर्यादी रहिमान, त्याचा मावसभाऊ युसूफ, गुलाब शेख, जमीर शेख, डॉ. अनिल हुलसवाकर, सपोनि ए. ए. शेख यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने शहेनाजविरुद्ध खटला चालवून तिला दोषी ठरविले. यात सरकारतर्फे अँड. रामदास वागज, मूळ फिर्यादीतर्फे शेखर टोणपे, बी. एस. लेंडवे तर आरोपीतर्फे डी. ए. मुल्ला, रजाक शेख यांनी काम पाहिले.