शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आता सुरू झाली मतदारांची मनवणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:11 IST

करमाळा : तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीची रंगीत तालीम ...

करमाळा : तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. तालुका पातळीवरील नेतेमंडळींनी गावपातळीवर प्रचारात लक्ष घातल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात कामधंद्याच्या निमित्ताने किंवा नोकरीनिमित्त गावाकडून शहराकडे गेलेली मंडळी ‘गड्या आपुला गाव बरा’ असे समजून गावाकडे आल्यानंतर त्यांना गावबंदी केली गेली. त्यामुळे बहुतांश जणांनी गावाकडे येण्याचेही टाळले होते.

आता ग्रामपंचायत निवडणूक लागल्याबरोबर गावपुढाऱ्यांना व गावकऱ्यांना त्यांची आठवण आली असून, ‘ताई, माई, दादा, भाऊ, गावाकडे कधी येणार?’ या वेळेस तरी गावी यावंच लागेल, जाण्या-येण्याच्या खर्चाबरोबरच इतरही बंदोबस्त केला जाईल’, असेही सांगितले जात आहे.

करमाळा तालुक्‍यातील सालसे व जेऊरवाडी या दोन ग्रमपंचायत बिनविरोध झाल्या असून, ४९ ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक निकालानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असले तरी, मीच सरपंच होणार ! अशा आविर्भावात सर्वजण वावरू लागले आहेत. त्यातच या निवडणुकांकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीची पूर्वतयारी समजली जाऊ लागल्याने तालुका पातळीवरील नेत्यांनी याकडे जातीने लक्ष दिले आहे.

करमाळा तालुक्‍यात निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कुंभेज, अर्जुननगर, हिवरवाडी, मांगी, मिरगव्हाण, पाडळी, पांडे, पांगरे, पाथुर्डी, पोटेगाव, सांगवी, सरपडोह, शेलगाव (क), आळजापूर, बाळेवाडी, देवीचामाळ, गुळसडी, सौंदे, वडगाव, पुनवर, देवळाली, शेटफळ, बोरगाव, बिटरगाव श्री, पोथरे, घारगाव, हिवरे, निमगाव हवेली, उमरड, सावडी, मलवडी, भोसे, रोशेवाडी, फिसरे, करंजे, ढोकरी, कविटगाव, साडे, कोंढेज, कुगाव, कोळगाव, जातेगाव, पिंपळवाडी, दिलेश्वर, झरे, आळसुंदे, नेरले, केडगाव, हिसरे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

----

आता गावाकडं आलं तर चालंल का?

पुण्या-मुंबईकडे गेलेल्या मंडळींना गावपुढारी, पॅनलप्रमुख, उमेदवार त्यांना आता फोनद्वारे संवाद करून गावाकडे येण्यासाठी विनवणी करू लागले आहेत. ‘आम्ही अडचणीत होतो तेव्हा गावकऱ्यांनी आम्हाला निराश केले होते, आता आम्ही गावाकडे आलो तर त्यांना चालेल का’, असा प्रतिप्रश्न ते विचारू लागले आहेत. त्यामुळे फोन करणाऱ्याची पंचाईत होऊ लागली आहे. त्यामुळे असे मतदार मतदानासाठी येणार? का? हेही पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.