शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:44 IST

करमाळ्यातील सामाजिक कार्यकर्ते अतुल खूपसे यांनी आपल्या फॉर्च्युनर गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आहे. वैष्णवीने हुंड्या प्रकरणी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे, याआधी तिला मारहाण झाल्याचेही म्हटले आहे. वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नात एक फॉर्च्युनर गाडी आणि ५१ तोळे सोने दिल्याचे सांगण्यात आले आहे. या फॉर्च्युनर गाडीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळातुनही या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहे, आता सोलापुरातील अतुल खुपसे यांनी स्वत:च्या फॉर्च्यूनर गाडीवर एक मजकूर लिहिला आहे. हा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

लोकमतचा अग्रलेखः 'फॉर्च्युनर संस्कृती'चे भोग

सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी त्यांच्या स्वत:च्या फॉर्च्युनर गाडीच्या मागील काचेवर हगवणे प्रकरणा संदर्भात मजकूर लिहिला आहे. 

फॉर्च्यूनरवरील मजकूर काय आहे?

"तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर,माझा रुबाबच वेगळा,हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा. अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवणे मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय, असा मजकूर अतुल खुपसे यांनी कारच्या मागच्या काचेवर लिहिला आहे. सध्या या मजकुराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'हा मजकूर लिहिण्यामागे कारण की...'

फॉर्च्युनरवरील व्हायरल झालेल्या मजकुरासंदर्भात आम्ही अतुल खुपसे यांची प्रतिक्रिया घेतली. यावेळी अतुल खुपसे म्हणाले, "मी जनशक्ती शेतकरी संघटनेचं काम करतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर फिरावं लागतं. मी याआधी स्विफ्टमधून प्रवास करत होतो. माझी डाळींबाची शेती आहे. मी पैसे साठवून काही दिवसांपूर्वीच मोठी फॉर्च्युनर गाडी घेतली. मी गाडी रोख घेतली आहे, पण पुण्यातील हगवणे प्रकरणामुळे माझ्या गाडीकडेही लोक संशयाने पाहत आहेत. मी कुठेही गेलो तर आता मला गाडी कशी घेतली असं विचारतात. हगवणे यांच्यामुळे ही गाडीसुद्धा बदनाम झाली. म्हणून मी माझ्या गाडीवर हा मजकूर टाकून घेतला." राज्यात दुसरी वैष्णवी होऊ नये हीच इच्छा. मुलीच्या वडिलांनी मुलाचे कर्तृत्व पाहून मुलीचे लग्न केले पाहिजे, अगदी मुलगा शेतकरी असला तरी चालेल, असंही त्यांनी नमूद केलं.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. वैष्णवीच्या वडिलांनी ही आत्महत्या हुंड्यासाठी असल्याचा आरोप केला. तसेच वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खूनाही सापडल्याचे सांगण्यात येत आहे. हगवणे यांनी दोन कोटींची मागणी केली होती, या पैशासाठीच वैष्णवीचा छळ केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. 

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेcarकारSocial Viralसोशल व्हायरल