शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

व्ही. शांताराम, दादा कोंडकेंचा नवीन चित्रपट मुंबईबरोबर बार्शीत झळकायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:22 IST

बार्शी व परिसरातील मराठी चित्रपटशौकिनांची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम लता चित्रमंदिरने केले. या चित्रमंदिराची स्थापना २५ जानेवारी १९५२ साली ...

बार्शी व परिसरातील मराठी चित्रपटशौकिनांची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम लता चित्रमंदिरने केले. या चित्रमंदिराची स्थापना २५ जानेवारी १९५२ साली किसनसिंह चौहान यांनी केली. त्यांनी धान्य गोदामालाच थिएटरचे रूप देऊन आकर्षक बनविले. प्रेक्षकांची मने कशी जिंकायची याचे बाळकडू त्यांनी पुत्र मदनमोहन यांना दिले. मदनमोहन यांनी १९७४ ला या थिएटरची पूर्ण धुरा सांभाळण्यास सुरुवात केली. १९५२ साली प्रदर्शित झालेल्या अमर भूपाळी या हिंदी चित्रपटापासून सुरू होऊन २००९ साली ‘दिल्ली-६’ या चित्रपटाने सांगता झालेल्या लता टॉकीजचा मनोरंजन सृष्टीतील प्रवास अत्यंत रंगतदार आहे.

लता टॉकीजने मराठमोळेपण जपले आहे. मराठी प्रेक्षकांनी जसे कॉमेडीवर प्रेम केले तसेच ‘पिंजरा’तील मास्तरांच्या ट्रॅजेडीवरही प्रेम केले. तसेच दादा कोंडके या अष्टपैलू कलाकाराचीही मराठी रसिकांवर जबरदस्त मोहिनी होती. बार्शीकर याला अपवाद नव्हते, असे मदनमोहन चौहान सांगतात.

चित्रपट व्यवसायातील सर्व नवे बदल स्वीकारले. काळानुरूप सुधारणा केल्या. १९५२ ला सुपर सिंपलेक्स मेड इन यूएसए या सिंगल मशीनवर चित्रपट दाखवले जात होते. त्यानंतर १९७५ ला डबल मशीन आली व ती २००९ पर्यंत कायम राहिली. याबाबतची आठवण सांगताना चौहान म्हणतात, चित्रपट सुरू असताना वीजपुरवठा खंडित व्हायचा. तेव्हा जनरेटरची सोय नव्हती. त्यामुळे उर्वरित चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना विशेष खुणेच्या चिठ्ठ्या देऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी आमंत्रित केले जायचे.

पाऊण एकर जागेत लाकडी बाकड्यापासून सुरू झालेल्या या टॉकीजची आसन क्षमता १९७४ साली ३०० प्रेक्षक इतकी होती. २००९ पर्यंत ही आसन क्षमता ४६० पर्यंत विस्तारली.

दादा कोंडके, उषा चव्हाण यांची भेट लक्षणीय ठरली

लता टॉकीजला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. मराठी चित्रपटांचा महामेरू असलेले दादा कोंडके आणि लावण्यवती उषा चव्हाण ही जोडी तेव्हा फॉर्मात होती. त्या काळात या जोडगोळीने अनेकदा थिएटरला भेटी दिल्या. त्यांच्या भेटी लक्षणीय ठरल्या. दिग्दर्शक कमलाकर तोरणे, अभिनेत्री जयश्री गडकर, निशिगंधा वाड, आधुनिक वाल्मीकी म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगूळकर, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, महेश कोठारे, रामदास फुटाणे, अभिनेते निळू फुले, डॉ. श्रीराम लागू यांनीही लता चित्रमंदिराला भेटी दिलेल्या आहेत.