उध्दव ठाकरे यांना सोलापुरात पाजला चहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 15:48 IST2018-10-27T15:45:26+5:302018-10-27T15:48:47+5:30

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शिवसेनेच्या विरोधात आंदोलन

Uddhav Thakre to drink tea in Solapur! | उध्दव ठाकरे यांना सोलापुरात पाजला चहा !

उध्दव ठाकरे यांना सोलापुरात पाजला चहा !

ठळक मुद्दे- राष्ट्रवादीचे शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी- उध्दव ठाकरे यांच्या प्रतिमेवर ओतला चहा- शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर

सोलापूर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बेताल वक्तत्व केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने सोलापूरात आंदोलन करण्यात आले. यावेळी उध्दव ठाकरे यांच्या प्रतिमेस चहा पाजून, डोक्यावर ओतुन आंदोलन करण्यात आले. अजित पवार यांच्या विरोधात खालच्या पातळीवर दैनिकांतून बेताल वक्तव्याचा निषेध करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवर आणि अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राम मंदिर, मस्जिद, चर्च आणि सर्व धार्मिक स्थळाबाबतीत कायम सन्मान केला आहे.  शिवसेना ही आता चिवसेना झाली आहे. त्यामुळे त्यांचा काही फायदा नाही. अजित पवार यांच्यावर दैनिकातून उध्दव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने टीका केली त्याच पद्धतीने यापुढे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सडेतोड उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया कार्याध्यक्ष सुहास कदम यांनी दिली.

 यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष निशांत सावळे, कार्याध्यक्ष सुहास कदम, उत्तर अध्यक्ष अतिष बचूटे, अमोल शिंदे, पदमसिंह शिंदे, सुशांत कांबळे, राकेश खळदकर, शुभम आंग्रे, अभिषेक बिराजदार, तुषार क्षीरसागर, महेश कोळेकर, ऋषिकेश काळे, अथर्व अत्रे, स्वप्नील केसरे आदी उपस्थित होते़ 

Web Title: Uddhav Thakre to drink tea in Solapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.