दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या नादात सिमेंट ट्रकने दोघांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:47 IST2020-12-05T04:47:29+5:302020-12-05T04:47:29+5:30

सोलापूर : दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या नादात नो-एन्ट्रीमधून घुसलेल्या सिमेंट ट्रकने भाजी विक्रेती महिला जुलेखा मुर्तूज शेख (वय ५०, रा़ ...

The two were crushed by a cement truck trying to rescue the two-wheelers | दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या नादात सिमेंट ट्रकने दोघांना चिरडले

दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या नादात सिमेंट ट्रकने दोघांना चिरडले

सोलापूर : दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या नादात नो-एन्ट्रीमधून घुसलेल्या सिमेंट ट्रकने भाजी विक्रेती महिला जुलेखा मुर्तूज शेख (वय ५०, रा़ पडगाजी नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) आणि मोहसीन मेहबूब पठाण (वय ३५, रा़ भुलाभाई चौक, रविवार पेठ, सोलापूर) या दुचाकीस्वाराला जोरात धडक दिल्याने भाजीविक्रेत्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिमेंटच्या पोत्यांनी भरलेला ट्रक अक्कलकोटवरून सोलापूर शहरात येत असताना मल्लिकार्जुन नगर येथे दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात चालकाने ट्रक डाव्या बाजूच्या भाजीविक्रीच्या ठिकाणी घातला. तेव्हा जुलेखा शेख यांना ट्रकने जोरात धडक दिल्याने त्यांचा एक पाय मोडून गाडीच्या मागच्या चाकांमध्ये अडकला तर दुसऱ्या पायाचे हाड मोडले़ यातच त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील मोहसीन यांना गंभीर इजा झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले; पण डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले़ घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दोन क्रेनद्वारे ट्रकला तेथून बाहेर काढण्यात आले़ काही संतप्त लोक ट्रकवर दगडफेक करत गाडी पेटविण्याचा प्रयत्न करत होते़ दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला पांगविले.

Web Title: The two were crushed by a cement truck trying to rescue the two-wheelers