सोलापूर ग्रामीणच्या पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By रवींद्र देशमुख | Updated: July 3, 2024 17:47 IST2024-07-03T17:47:20+5:302024-07-03T17:47:32+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशासनातील विविध अधिकाऱ्याच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे.

Transfer of five police officers of Solapur Rural | सोलापूर ग्रामीणच्या पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर ग्रामीणच्या पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर : सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचा आदेश पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशासनातील विविध अधिकाऱ्याच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी  त्यांचा कार्यकाल पूर्ण केला त्यांची बदली झाली आहे.

बदली झालेल्या अधिकार्यांचे नाव आणि त्यांच्या पुढे बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे – पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांची सुरक्षा शाखा ते बाशी शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची पंढरपूर मंदिर समिती ते मंगळवेढा पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक रणजित माने यांची मंगळवेढा ते पंढरपूर मंदिर समिती, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांची मानव संसाधन शाखा ते सोलापूर तालुका पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची सोलापूर तालुका पोलीस ठाणे ते जिल्हा विशेष शाखा.

Web Title: Transfer of five police officers of Solapur Rural