शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

औषधांची अधिक मात्रा घेतली; तरुण रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:48 IST

दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार जखमी सोलापूर : सायकलवरून सोनामाता शाळेजवळ जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने सायकलस्वार जखमी ...

दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार जखमी

सोलापूर : सायकलवरून सोनामाता शाळेजवळ जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने सायकलस्वार जखमी झाला. नरसिंग तिमप्पा म्हेत्रे (वय ६२, रा. मधुकर वस्ती, रामवाडी) असे जखमी सायकलस्वाराचे नाव आहे. घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.

शेतीच्या वादातून दोघांना मारहाण

सोलापूर : शेतीच्या वादातून सात जणांनी मिळून दोघांना मारहाण केल्यामुळे दोघे जखमी झाले आहेत. कविता हरिदास पवार (वय ३८, रा. कर्देहळ्ळी, दक्षिण सोलापूर), हरिदास तुकाराम पवार (वय ४८, रा. कर्देहळ्ळी ) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.

दुचाकी घसरून पडल्याने महिला जखमी

सोलापूर : विटकर वसाहत येथून दुचाकीवरून जात असताना दुचाकी घसरून पडल्याने महिला जखमी झाली आहे. राधा चिप्पा (वय ३९, रा. गांधी नगर, अक्कलकोट रोड) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.

मालवाहतुकीच्या धडकेत तरुण जखमी

सोलापूर : मोटरसायकलवरून मौलाना चौक येथून जात असताना कुंभार गल्ली येथे मालवाहतूक गाडीने धडक दिल्याने गजानन वाघमारे (वय ३०) हा तरुण जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

सोलापूर : अज्ञात कारणातून गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. अमीन हुसेन मुजावर (वय ३२, रा. संगमेश्वर नगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्रीच्या सुमारास अमीन याने घराच्या छताच्या वाश्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना कुटुंबीयांना कळताच त्याला खाली उतरवून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.