यशोगाथा; मात्रा सेंद्रिय खताची, यशोगाथा भरगच्च शेवग्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 01:01 PM2020-02-17T13:01:23+5:302020-02-17T13:05:17+5:30

रासायनिक खते टाळली; बोरगाव (दे़) येथील उच्चशिक्षित मलकप्पा कल्याणी यांची यशोगाथा

Success stories; The quantity of organic manure, the success story of the pods | यशोगाथा; मात्रा सेंद्रिय खताची, यशोगाथा भरगच्च शेवग्याची

यशोगाथा; मात्रा सेंद्रिय खताची, यशोगाथा भरगच्च शेवग्याची

googlenewsNext
ठळक मुद्देशेतात ४ बाय ८ व अडीच फूट खोलीचा गांडूळ बेड तयार केलागाईचे शेण, गोमूत्र ,बेसन ,गूळ ,पाणी यांचे योग्य प्रमाण घालून जीवामृत तयार केलेआठ दिवसांनंतर ते तांब्याने किंवा ड्रीपने शेवगा आणि फळझाडांना दिले

शंभूलिंग अकतनाळ 

चपळगाव : शिक्षण घेतले, परंतु नोकरी नाही़़. मुंबई, पुणे येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी शैक्षणिक खर्चाला आर्थिक पाठबळ नाही. अनेक ठिकाणी मुलाखत देऊनही पदरी निराशाच़़. नोकरी मिळते, पण मनासारखी नसल्यामुळे मन लागत नाही. अशातून आशेचा किरण लाभला आणि शेवग्याची प्रयोगशील शेती केली. क़मी पाण्यावर, कमी खर्चात लाखो रुपयांचे पीक देणारे ठरले.

ही किमया साधली आहे. बोरगाव (दे.) (ता़ अक्कलकोट) येथील मलकप्पा परमेश्वर कल्याणी या तरुण शेतकºयाने़ त्यांनी स्वत:ची प्रयोगशील शेती म्हणून ओळख निर्माण केली आहे. उच्चशिक्षित मलकप्पा यांना नोकरी मिळू शकली नाही.  जिद्द व चिकाटीने उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करत. शेतीतून आयुष्य फुलविले आहे़ वडील परमेश्वर यांची पाच एकर शेती अशी शेती की जिथे कुसळ सोडून कोणतेच पीक येत नव्हते. दहावी शिक्षण झाल्यानंतर मलकप्पांचे वडीलछत्र हरपले. त्यापाठोपाठ मोठ्या भावाचेही छत्र हरपले. आता काय करावे? या विवंचनेत असताना मलकप्पा यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केल़े पाच एकर डोंगर फोडून काढले. जमीन सपाटीकरण करून घेतले. सुरुवातीला केशर व हापूस आंब्याची ४० रोपे लावली. 

दुसºया वर्षात १५० आंब्याची रोपे लावली. त्यानंतर शेतात बोअर घेतले. ठिबक सिंचन योजना राबवली़ त्याच जोरावर शेवग्या (ओडीसा वाण)ची शंभर झाडं लावली़ हे पीक घेत असताना एकदाही रासायनिक खतांचा वापर केला नाही. 

शेतात ४ बाय ८ व अडीच फूट खोलीचा गांडूळ बेड तयार केला़ त्यात शेण, काडीकचरा टाकून व्हर्मीवॉश, कम्पोस्ट खत निघतो तोच खत या फळबागांसाठी आणि शेवग्यासाठी वापरले़ गाईचे शेण, गोमूत्र ,बेसन ,गूळ ,पाणी यांचे योग्य प्रमाण घालून जीवामृत तयार केले़ आठ दिवसांनंतर ते तांब्याने किंवा ड्रीपने शेवगा आणि फळझाडांना दिले़ सात महिन्यांत हे पीक हाती आले़ 

आंतरपिकांचा आधार 
- फळबागेत आंतरपीक म्हणून हरभरा, टोमॅटो,मिरची, हळद, गहू, कांदा ही पिके घेतली. फळबागेसाठी कीटकनाशके म्हणून ब्रह्मास्त्र, निमास्त्र तर फुलांसाठी बाजारातील जैविक औषधे यांची मात्रा दिली. पावसाचे पाणी वाहून जाता कामा नये म्हणून शेतात ओटे बांधले आहेत. मलकप्पा यांना त्यांची आई रत्नाबाई, पत्नी शोभा व त्यांची मुलंसुद्धा शेतीकामात हातभार लावतात. 

शेतकºयांनी पारंपरिक पिके न घेता कमी खर्चातील जास्त उत्पन्न देणारे पीक घ्यायला हवे. त्यापैकीच शेवगा एक असून, याला स्थानिक आणि बाहेरही बाजारपेठ सहज उपलब्ध आहे़ यात आंतरपीक घेता आले़ अशा प्रकारच्या शेतीतून खरोखरच प्रयोग करता आले़ आर्थिक बळही मिळाले़.

-मलकप्पा कल्याणी 

Web Title: Success stories; The quantity of organic manure, the success story of the pods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.