विधानसभेचे अध्यक्ष करणार चंद्रभागा तीराची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:10+5:302020-12-05T04:46:10+5:30

पंढरपुरातील संत तुकाराम भवन येथे गुरुवारी सकाळी आठच्या दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वारकरी महाराज मंडळींची ...

The Speaker of the Legislative Assembly will inspect Chandrabhaga Tira | विधानसभेचे अध्यक्ष करणार चंद्रभागा तीराची पाहणी

विधानसभेचे अध्यक्ष करणार चंद्रभागा तीराची पाहणी

पंढरपुरातील संत तुकाराम भवन येथे गुरुवारी सकाळी आठच्या दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वारकरी महाराज मंडळींची बैठक होणार आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर ते सकाळी पावणेदहाच्या दरम्यान सरकोली येथे जाऊन भालके कुटुंबीयांची सांत्वन भेट घेणार आहेत.

आळंदी वारीसंदर्भात होणार चर्चा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी, कार्तिकीसह सर्वच प्रमुख यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. यानंतर आता ८ ते १४ डिसेंबरदरम्यान आळंदी येथे साजरा होणाऱ्या संजीवन समाधी सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. १३ डिसेंबर रोजी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे. आळंदी वारीसंदर्भात वारकरी महाराज मंडळींशी चर्चा करण्यासाठी पटोले हे उद्या पंढरपुरात येणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे सदस्य तथा वारकरी-फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिली.

----

Web Title: The Speaker of the Legislative Assembly will inspect Chandrabhaga Tira