शहीद स्मारक उभारण्याकरिता जागा मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:47 IST2020-12-05T04:47:49+5:302020-12-05T04:47:49+5:30

सोलापूर जिल्ह्यातील इतर शहरात शहीद स्तंभ, स्मारक उभारल्याने त्या त्या शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. तसे शहीद ...

Space should be provided for erection of martyr's memorial | शहीद स्मारक उभारण्याकरिता जागा मिळावी

शहीद स्मारक उभारण्याकरिता जागा मिळावी

सोलापूर जिल्ह्यातील इतर शहरात शहीद स्तंभ, स्मारक उभारल्याने त्या त्या शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. तसे शहीद स्मारक उभारणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. देशाच्या संरक्षणासाठी सांगोला शहर व तालुक्यातील अनेक जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या स्मरणार्थ सांगोला नगरपरिषदेकडून आरक्षित केलेल्या ठिकाणी भव्य शहीद स्तंभ, स्मारकास जागा मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. शहाजीबापू पाटील, तहसीलदार अभिजित पाटील यांनाही दिल्या आहेत.

Web Title: Space should be provided for erection of martyr's memorial