शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

पाणी भरण्यासाठी महिला रस्त्यांवर; तहान भागवण्यासाठी कुटुंब उपाशी ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 1:08 PM

सोलापूर शहरात पाणीटंचाई ; शहराच्या हद्दवाढ भागात आठ दिवसाआड होतोय पाण्याचा पुरवठा    

ठळक मुद्देरुपाभवानी चौकातील पाणी गिरणी, गुरुनानक चौकातील साधू वास्वानी केंद्र आणि जुळे सोलापूर पाणी टाकी या तीन केंद्रावरुन सध्या शहराला पाणीपुरवठा होतोय.ज्या भागात पाण्याचा सर्वाधिक तुटवडा आहे अशा भागात खासगीमध्ये पाणी विक्रीही जोरात सुरु आहेछोट्या नगरात आणि वस्त्यांमध्ये पाच हजार लिटर तर जास्त लोकसंख्येच्या नगरात दहा हजार लिटरच्या टँकरने पाणीपुरवठा सुरु

 सोलापूर : तहानलेला हद्दवाढ भाग.. रणरणते ऊऩ़़ हातामध्ये भांडे घेऊन धावणारी लहान मुले़.. इतक्यात टँकर येतो़.. महिलांची गर्दी होते़..पाण्यासाठी गोंधळ उडतो.. तुझे भांडे, माझी घागर वादविवाद होतो़.. पाहता पाहता २५ मिनिटांत टँकर खाली होतो़..झोप उडवून दिलेल्यांना दिलासा मिळतो.

हे दृश्य आहे हद्दवाढ भागातील माधव नगरमधील़ माधव नगरप्रमाणेच इतर नगरांची अवस्था शुक्रवारी निदर्शनास आली़ जिकडे तिकडे टँकर रस्त्यात दिसताच त्यामागे ‘टँकर आला़़़ पळा, पळा’ अशी ओरडत धावणारी मुले दिसली़ दुपारी अडीच वाजता दहा हजार लिटरचा टँकर या नगरात आला़ तो पोशम्मा देवी मंदिरासमोर थांबताच अवतीभोवती प्लास्टिक बॅरेल, घागरी, हंडे टाकी घेऊन महिलांनी गर्दी केली़ रांगेत आणि समान पाणी घेण्यावरुन एकमेकात वाद-विवाद सुरु झाला.

 लहान मुले लहान भांडी, बकेटमध्ये भरलेले पाणी घेऊन घराकडे धावत़ पुन्हा हातातील भांडे घेऊन टँकरकडे धावणारे दृश्य होते़ पाणी घेण्यात बरेच पाणी खाली वाहून जाते़ या तीनही केंद्रावर पाच हजार लिटर आणि दहा हजार लिटर अशा दोन प्रकारातले टँकर भाडे तत्त्वावर लावले गेले आहेत़ छोट्या नगरात आणि वस्त्यांमध्ये पाच हजार लिटर तर जास्त लोकसंख्येच्या नगरात दहा हजार लिटरच्या टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

पाणी उपसा केंद्रावरही अशी धांदल अधिकारी आणि कर्मचाºयांमध्ये दिसून येते़ अधिकाºयांच्या सूचना फोनवरुन यायच्या आणि त्या सूचनांनुसार संबंधित नगरात टँकर भरुन पाठवण्यासाठी कर्मचाºयांची उडालेली धांदल पाहायला मिळाली.

दोन दिवसात टँकरच्या खेपा डबल- रुपाभवानी चौकातील पाणी गिरणी, गुरुनानक चौकातील साधू वास्वानी केंद्र आणि जुळे सोलापूर पाणी टाकी या तीन केंद्रावरुन सध्या शहराला पाणीपुरवठा होतोय. या तीनही केंद्रावरुन दोन दिवसात टँकरच्या खेपा वाढल्या आहेत. पाणी गिरणी येथून शुक्रवारी ४४ टँकर पाणीपुरवठा झाला़ दोन दिवसात या केंद्रावर १५ ते २० टँकर खेपा अधिक झाल्या़ तसेच साधू वास्वानी केंद्रातून दोन दिवसापूर्वी सहा टँकरने पाणीपुरवठा झाला होता़ शुक्रवारी टँकरची संख्या ही १२ वर पोहोचली़ अशीच स्थिती जुळे सोलापुरातील केंद्रावर होती़ 

बॅरल २० रुपये तर जार ४० रुपये - ज्या भागात पाण्याचा सर्वाधिक तुटवडा आहे अशा भागात खासगीमध्ये पाणी विक्रीही जोरात सुरु आहे. माधव नगर आणि अशोक चौक परिसरात खासगीमध्ये काही बोअरधारक ांनी २० रुपये बॅरल पाणी विक्री सुरु केली आहे़ तसेच जारने पाणी पुरवठादेखील वाढला आहे़ चौका-चौकातून पाण्याचे जार घेऊन जाणारे रिक्षा दिसताहेत़ जारमधील पाणी ४० रुपयांनी पुरवठा होतोय़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाdroughtदुष्काळ